AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan: वयाच्या 60 व्या वर्षी आमिर खानने घटवलं 18 किलो वजन, जाणून घ्या अभिनेत्याचा डाएट आणि फिटनेस टिप्स

Aamir Khan: अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. पण आता अभिनेता फिटनेस टिप्समुळे चर्चेत आला आहे. वयाच्या 60 व्या वर्षी अभिनेत्याने 18 किलो वजन कमी केलं आहे. जाणून घ्या अभिनेत्याचा डाएट आणि फिटनेस टिप्स

Aamir Khan: वयाच्या 60 व्या वर्षी आमिर खानने घटवलं 18 किलो वजन, जाणून घ्या अभिनेत्याचा डाएट आणि फिटनेस टिप्स
अभिनेता आमिर खान
| Updated on: Sep 20, 2026 | 12:19 PM
Share

Aamir Khan: 60 व्या वर्षी वृद्धत्व येतं असं प्रत्येक जण म्हणतो, या वयात अनेक जण शारीराला आरम देतात. पण अभिनेता आमिर खान याने वयाच्या 60 व्या वर्षी 18 किलो वजन कमी केलं आहे. उतार वयात तब्बल 18 किलो वजन कमी करणं मोठं आव्हान आहे. सांगायचं झालं तर, अभिनेत्याने कोणतं कठीण वर्कआऊट न करता आणि डाएट शिवाय 18 किलो वजन कमी केलं आहे. अशात तुम्ही देखील विचार करत असाल कीं, वर्कआउट आणि डाएट शिवाय कसं वजन कमी केलं असेल. तर जाणून घ्या अभिनेत्याने कसं वजन केलं. जाणून घ्या डाएट आणि फिटनेस टिप्स…

मायग्रेन ठरली मोठी समस्या…

आमिर खान मायग्रेनचा सामना करत आहे, यावर आरम मिळवण्यासाठी अभिनेत्याने एंटी – इंफ्लेमेटरी डाएट सुरु केलं आहे. यामध्ये अनेक पथ्य पाळावे लागतात आणि हेल्दी पदार्थांचं सेवन करण्याचा सल्ला देतात. आमिर याने डाएट करण्याची सुरुवात केली आणि ज्याचा फायदा अभिनेत्याला झाला. यामुळे आमिर खान याचं 18 किलो वजन कमी झालं आहे.

एंटी – इंफ्लेमेटरी डाएट म्हणजे काय?

न्यूट्रिशनिस्ट रजुता दिवेकर यांनी एंटी – इंफ्लेमेटरी डाएटबद्दल सांगितलं की, फक्त डाएट फॉलो केल्याने वजन कमी होत नाही. पण त्याचा शारीराला मोठ्या प्रमाणात फायदा होतो. या डाएटमध्ये साखर, मैदा, मद्य, प्रोसेस्ड फूड यांसरखे पदार्थ टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात. हे पदार्थ डाएटमधून वगळल्यास वजन कमी होण्यास मदत होईल…

काय खातो आणि खान?

शरीरातील अंतर्गत सूज कमी करण्यासाठी आमीरने आपल्या आहारात डार्क चॉकलेट, चरबीयुक्त मासे, चेरी, ब्रोकोली, ग्रीन टी, अ‍ॅवोकॅडो, द्राक्षे, टोमॅटो, मशरूम आणि बेरीज यांसारख्या अनेक पदार्थांचा समावेश केला. हे सर्व पदार्थ शरीराच्या आतील सूज कमी करतात, तसेच पोट दीर्घकाळ भरलेलं ठेवतात. याशिवाय, या आहारामुळे शरीरात चरबी साचत नाही.

झोप आणि इतर गोष्टींची काळजी

तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यात असाल, तरी झोपेची विशेष काळजी घ्या. जर तुमची झोप पूर्ण होत असेल, तर तुमचे शरीर लवकर बरे होईल. झोप कमी झाली, तर शरीर व्यवस्थित काम करणार नाही. आमीर खानने आहाराव्यतिरिक्त आपली झोप, खाण्यापिण्याची सवय आणि व्यायाम या प्रत्येक गोष्टीची योग्य काळजी घेतली आणि काही महिन्यांत स्वतःचं वजन कमी केलं.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल