आशीष विद्यार्थी यांनी थाटला दुसरा संसार, कसं आयुष्य जगतेय पहिली बायको? म्हणाली, ‘त्यांनी दुसरं लग्न केलं कारण…’
Ashish Vidyarthi EX Wife Piloo: वयाच्या 60 व्या आशीष विद्यार्थी यांनी उकरलं दुसरं लग्न, दुसरी बायको प्रचंड सुंदर, घटस्फोटानंतर पहिली बायको म्हणाली, 'लग्न म्हणजे फक्त देखावा आणि...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा...

Ashish Vidyarthi EX Wife Piloo: अभिनेते आशीष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी आसाममधील फॅशन उद्योजिका रूपाली बरुआ हिच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अनेकांना अभिनेत्याला नव्या आयुष्यातसाठी शुभेच्छा दिल्या तर, अनेकांनी ट्रोल केलं. वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न केल्यामुळे विद्यार्थी यांनी ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पहिल्या लग्नाला 22 वर्ष झाल्यानंतर आशीष यांची दुसरं लग्न केलं. पण तेव्हा त्यांची पहिली पत्नी आणि अभिनेत्री पीलू यांनी मौन बाळगलं. पण आता त्यांनी घटस्फोटानंतर पहिल्यांदा मौन सोडलं आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत पीलू यांनी अनेक मोठे खुलासे केलं. घटस्फोटानंतर नाव का नाही बदललं? असा प्रश्न पीलू यांना विचारण्यात आला, यावर त्या म्हणाल्या, ‘आपल्या देशात नाव बदलणं फार सोपं नाही. आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. जर दुसरं लग्न केलं तर नाव बदलणं सोपं असेल… नाव बदलण्यासाठी कोणती सक्ती नाही. मला आणि आशीष यांनी काही अडचण नाही.’
आशीष यांच्या दुसऱ्या लग्नावर पीलू म्हणाल्या, ‘रुपाली लग्नानंतर स्वतःच्या नावापुढे बरुआ लावतो. मी विद्यार्थी लावते… यामध्ये मला कोणतीही अडचण नाही… रुपाली हिचा स्वभाव देखील साधा आहे…’
पुढे पीलू यांनी नात्यावर मोठं वक्तव्य केलं, ‘आजच्या काळात लग्न फक्त एक तडजोड आणि देखावा आहे. मी आणि आशीष यांनी विचार करुन विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण आम्ही दोघेही वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहोत. आता आशिषला त्याच्यासाठी योग्य असा जोडीदार सापडला आहे. मी त्याच्यासाठी आनंदी आहे आणि माझ्या आयुष्यात पुढे गेलो आहे.’
दुसऱ्या लग्नावर काय म्हणाल्या पीलू? ‘मी आता माझ्या आयुष्यात फार पुढे आली आहे. मला आता कोणत्याच गोष्टीची खंत वाटत नाही… फक्त कधी-कधी जोडीदाराची कमतरता भासते…. पण सध्या तरी दुसऱ्या लग्नाचा माझा कोणताच विचार नाही… पण प्रेमासाठी मी आजही तयार आहे. पण लग्न करायचं नाही…’
ऑनलाइन डेटिंगबद्दल विनोदी अंदाजात पीलू म्हणाल्या, ‘ऑनलाइन डेटिंग माझ्याकडून अशक्य आहे… जर नातं नैसर्गिकरित्या तयार झालं तर मी त्यासाठी तयार आहे.’ पीलू यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक सिनेमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
नुकताच दोन हीट सिनेमांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अभिनेत्री काजोल स्टारर ‘सरजमीन’ आणि अभिनेत्री वाणी कपूर स्टारर ‘मंडला मर्डर्स’ सिनेमात देखील पीलू यांनी दमदार भूमिका साकारली आहे. पीलू सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत.
