AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या रील्समुळे राहुल रॉयची इतकी चर्चा; ‘ती’ महिला आहे तरी कोण?

'आशिकी' फेम अभिनेता राहुल रॉयने एका कंटेंट क्रिएटरसोबत रील्स बनवले आणि सोशल मीडियावर या रील्सचीच जोरदार चर्चा होऊ लागली. यावरून राहुल रॉयला अनेकांनी ट्रोलसुद्धा केलंय. राहुलने ज्या कंटेंट क्रिएटरसोबत रील्स केले, ती कोण आहे, हे जाणून घ्या..

ज्या रील्समुळे राहुल रॉयची इतकी चर्चा; 'ती' महिला आहे तरी कोण?
Rahul RoyImage Credit source: Instagram
| Updated on: May 01, 2026 | 9:43 AM
Share

‘आशिकी’ या चित्रपटामुळे रातोरात स्टार बनलेला अभिनेता राहुल रॉय सध्या इन्स्टाग्रामवरील काही रील्समुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. या रील्सवरून अनेकांनी त्याची खिल्ली उडवली असून, अशी कोणती मजबुरी होती, असा सवाल त्याला केला आहे. या ट्रोलिंगनंतर सोशल मीडियावर पोस्ट लिहित राहुलने त्याच्या आर्थिक समस्यांचा खुलासा केला. खिल्ली उडवण्यापेक्षा मला चांगलं काम देण्यासाठी प्रयत्न करा, असं सडेतोड उत्तर त्याने नेटकऱ्यांना दिलं. यानंतर राहुल रॉयसोबत झळकलेली ती महिला कोण आहे, याविषयी नेटकऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झालं.

या कंटेंट क्रिएटरचं नाव वनिता घाटगे असून ती एक डॉक्टर आहे. इन्स्टाग्रामवर ती बऱ्यापैकी सक्रिय असून सतत विविध रील्स पोस्ट करत असते. वनिताच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे स्पष्ट होतंय की ती राहुल रॉयला बऱ्याच काळापासून ओळखते. 2024 मध्येही तिने राहुलसोबत एका गाण्यावर रील बनवून शेअर केला होता. वनिताने दूरदर्शनवरही काम केलंय. तिने या वाहिनीच्या बऱ्याच शोजसाठी सूत्रसंचालनाचं काम केलंय. यामध्ये दूरदर्शन पुण्यातील ‘कृषी वार्ता’चाही समावेश आहे. याचेही काही व्हिडीओ वनिताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ती अनेक सामाजिक कार्यांशीही निगडीत आहे.

काही युजर्स असाही दावा करत आहेत की, जेव्हा राहुल रॉयला ब्रेक स्ट्रोक आला होता, तेव्हा वनितानेच त्याच्या उपचारासाठी मदत केली होती. तेव्हापासून या दोघांचे चांगले संबंध आहेत. परंतु या चर्चांवर अद्याप वनिताने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. परंतु सोशल मीडियावर ट्रोल होत असल्याचं पाहून राहुलने भलीमोठी पोस्ट लिहित आपली बाजू मांडली होती.

‘मी माझं काम प्रामाणिकपणे आणि विनम्रतेने करतो. मला काही कायदेशीर प्रकरणांमध्ये पैसे द्यायचे आहेत आणि ही प्रकरणं आजची नाहीत. ही त्यावेळची आहेत, जेव्हा मला ब्रेक स्ट्रोक आला नव्हता. जर तुम्ही माझ्या साधेपणाची किंवा माझ्या समस्यांची खिल्ली उडवत असाल, ट्रोल करत असाल तर हे माझ्याबद्दल कमी आणि तुमच्याबद्दल अधिक सांगतं. जर तुम्हाला खरंच इतकी चिंता असेल तर मला एखादं चांगलं आणि योग्य काम मिळवण्यात मदत करा, जेणेकरून मी माझ्या खटल्यांचे पैसे देऊ शकेन. कमीत कमी मी मेहनत करून पैसे कमावतोय, दुसऱ्यांची खिल्ली उडवून नाही,’ अशा शब्दांत राहुलने सुनावलं होतं.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...