AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aayush Sharma On Trolls : पैशांसाठी सलमानच्या बहिणीशी लग्न केलं… ट्रोलर्सना आयुषने दिले सडेतोड उत्तर

बॉलिवूड अभिनेता आयुष शर्मा त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्याच्या पर्सनल लाईफबद्दलही चर्चेत असतो. सोशल मीडिया यूजर्स आयुषला सतत ट्रोल करत असतात.

Aayush Sharma On Trolls : पैशांसाठी सलमानच्या बहिणीशी लग्न केलं... ट्रोलर्सना आयुषने दिले सडेतोड उत्तर
Image Credit source: instagram
| Updated on: Jun 01, 2023 | 4:23 PM
Share

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा (Salman khan) धाकटा मेहुणा आणि अभिनेता आयुष शर्मा (Aayush Sharma) अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे. सलमान खान आपल्या मेव्हण्याची कारकीर्द सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. मग ते आयुषला चित्रपटात घेणे असो किंवा त्याच्या चित्रपटांना सपोर्ट करणे असो. आयुष त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत असतो. सलमान खानच्या बहिणीशी, अर्पिताशी (Arpita khan) आयुषचे झालेले लग्न चर्चेत आले होते.

सोशल मीडियावरही आयुषला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. खरंतर काही यूजर्सचे म्हणणे आहे की अर्पिता आणि तिचा भाऊ सलमान, यांच्याकडे असलेल्या पैशांमुळे आयुषने तिच्याशी लग्न केले. त्यानंतर आता या अभिनेत्याने सतत होणाऱ्या ट्रोलिंगवर मौन सोडले आहे. आयुष आणि अर्पिताने 2014 मध्ये लवयात्री चित्रपट रिलीज होण्याच्या चार वर्षे आधी लग्न केले होते. त्यांना आहिल हा मुलगा आणि मुलगी आयत, अशी दोन मुले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Aayush Sharma (@aaysharma)

नुकतेच एका मुलाखतीदरम्यान आयुषने त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले की, अर्पिता एक अतिशय मजबूत, आत्मविश्वासू स्त्री आहे आणि तिच्यासारखी जोडीदार मिळणे खूप आनंददायी आहे. ती कोण आहे, हे ती (अर्पिता) स्वीकारते. या सततच्या ट्रोलिंगचा माझ्यावर परिणाम झाला नाही कारण मी शोबिझमध्ये नवीन असला तरी ही बाजू पाहिली आहे, असे आयुष म्हणाला. मात्र पैशांसाठी आणि अभिनेता बनण्यासाठी आपण अर्पितशी लग्न केलं, या ट्रोलर्सच्या सिद्धांतामुळे आपण खूप दुखावलो गेलो, असे त्याने नमूद केले.

View this post on Instagram

A post shared by Aayush Sharma (@aaysharma)

आयुष शर्माच्या म्हणण्यानुसार, त्याचे अर्पितावर प्रेम होते आणि त्यामुळे तिच्याशी लग्न केले. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे अर्पिता, तिच्या घरचे आणि स्वत: आयुष यांना ही (प्रेम) गोष्ट माहीत आहे. सलमान खान पैसे खर्च करत असल्याच्या अफवेबद्दलही अभिनेता बोलला. तो म्हणाला की, जेव्हा मी सुट्टीवर जायचो तेव्हाही मला ट्रोल केले जायचे. अनेक लोक म्हणायचे, की मी सलमान खानचे पैसे उडवत आहे. आमच्या लग्नाच्या वेळेसे अशाही चर्चा होत्या की सलमान खानने आम्हाला एक रोल्स रॉयस भेट दिली होती. ती कार कुठे आहे हे मी अजूनही शोधतोय असे सांगत आयुषने या सर्व अफवा असल्याचे नमूद केले.

काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.