Amitabh Bachchan : ‘ स्वतःला काय समजतोस रे म्हाताऱ्या?’ ट्रोलिंगमुळे अमिताभ बच्चन त्रस्त ; म्हणाले, लोकांच्या कमेंट्स वाचून..
अमिताभ बच्चन यांनी नुकतीच सोशल मीडिया ट्रोलिंग आणि नकारात्मकतेबद्दल आपल्या मनातील विचार सांगितले. 'कौन बनेगा करोडपती'वर एका स्पर्धकाच्या प्रश्नावर, बिग बींनी टीकेचा सामना कसा करतात, ते सांगितलं.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी नुकतंच, सोशल मीडियावर होणार ट्रोलिंग आणि टीकेबद्दल त्यांच्या ‘मन की बात’ सांगितली आहे. सोशल मीडियावरीर निगेटिव्हिटीचा सामना कसा करायचा ? असा सवाल ‘कौन बनेगा करोडपति’ च्या सेटवर एका स्पर्धकाने बिग बी यांना विचारला. त्यावर अमिताभ यांनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे. त्यांच्या वयाच्या, त्यांच्या पिढीतल्या लोकांना आजही टीका किंवा निगेटीव्ह कमेंट्स झेलणं, त्या सहन करणं कठीण जातं, असं त्यांनी सांगितलं.
केबीसीच्या एपिसोडदरम्यान विनम्र याने बच्चन यांना खूप सोपा आणि आजच्या काळाशी निगडीत प्रश्न विचारला. ‘ सोशल मीडियावर जी टीका किंवा ट्रोलिंग होतं, ते तुम्ही कसं हाताळता सर ? असं मला तुम्हाला विचारायचं आहे; माझ्या वयाचे जे लोक आहे, त्यांना टीका बिलकूल हाताळता येत नाही, सहन करता येत नाही, असंही त्याने पुढे नमूद केलं.
वयावरून अमिताभ यांना लोकं करतात ट्रोल
सोशल मीडियाबद्दल बोलताना बिग बी म्हणाले, “ सुरुवातीला मला असं वाटलं होतं की, हे एक खूप चांगलं माध्यम आहे. याद्वारे आपण आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकतो. पण यावर लोक काय कमेंट करतात, हे जेव्हा मी वाचायला सुरुवात केली, तेव्हा मी तर असं लिहिणंच बंद केलं. लोक लिहितात — ‘तू स्वतःला काय समजतोस रे म्हाताऱ्या? असं का बोलतोस?’ अशा प्रकारची भाषा पाहून खूप विचित्र वाटतं. त्यामुळे आता मी लिहिणं खूप कमी केलं आहे.” असं म्हणत बिग बींनी त्यांचा अनुभ सांगितला.
वेगाने वाढत आहेत अमिताभ बच्चन यांचे फॉलोअर्स !
मात्र या गंभीर संवादानानंतर, वातावरण थोडं हलकं करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी पुढे जे म्हटलं ते ऐकून, स्पर्ध विनम्र आणि स्टुडिओमध्ये उपस्थित असलेले सर्वजण हसून हसून लोटपोट झाले. पुढे बिग बी म्हणाले, “आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का? जेव्हापासून मी लिहिणं कमी केलं आहे, तेव्हापासून आमचे फॉलोअर्स आणखी वेगाने वाढत आहेत!” असं ते मिश्किल अंदाजात म्हणाले.
नुकताच साजरा केला 84 वा वाढदिवस
सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन यांनी काल, म्हणजेच रविवार 11 ऑक्टोबर रोजी, त्यांचा 84 वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी मुंबईतील त्यांच्या ‘जलसा’ या निवासस्थानाबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती. बिग बी आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी घराबाहेर आले आणि त्यांनी हात जोडून सर्वांना अभिवादन केलं. अमिताभ बच्चन यांनी 2008 साली त्यांचा स्वतःचा वैयक्तिक ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती. तेव्हापासून आजपर्यंत ते विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत.