
बॉलिवूडमध्ये प्रत्येकाला आपली एक खास ओळखं निर्माण करायची असते. त्यानुसार सगळेच प्रयत्न करतात. स्टारडम आणि ग्लॅमर आयुष्य जगायला प्रत्येक सेलिब्रिटीला आवडतं. प्रत्येक अभिनेत्याला जास्तीत जास्त लोकप्रियता मिळवायची असते. पण असा एक अभिनेता आहे ज्याने हे बॉलिवूडचं झगमगत जग सोडून एक वेगळाच मार्ग अवलंबला आहे. या अभिनेत्याला चित्रपट पार्श्वभूमी असूनही, स्टारडमपासून दूर राहायचे होते.
अभिनेता सरळ जंगलात राहायला गेला आहे.
त्यासाठी या अभिनेत्याने अनेकदा लांब जाण्याचाही प्रयत्न केला. एकदा तर हा अभिनेता परदेशात पळून गेला होता. पण आता या अभिनेत्याने जी जागा निवडली ती फारच वेगळी आहे. ती जागा कोणतं शहर नाही, किंवा कोणता देश नाही तर हा अभिनेता सरळ जंगलात राहायला गेला आहे. होय, आपलं सगळं प्रसिद्धच साम्राज्य सोडून हा अभिनेता जंगलात राहतोय. अभिनेत्याने स्वतः सांगितले की त्याला मुंबईत राहायचे नाही, म्हणून तो जंगलात राहायला गेला आहे. यामागील कारण काय आहे आणि हा अभिनेता कोण आहे जाणून घेऊयात.
मुंबई शहर सोडून गोव्याच्या जंगलात राहत आहे
हा अभिनेता अभय देओल. हा सनी देओल आणि बॉबी देओलचा चुलत भाऊ आहे. अभयची बॉलिवूड कारकीर्द खूप मोठी आहे. त्याने अनेक हीट चित्र पट दिले आहेत. पण त्याला प्रसिद्धीपासून दूर राहणे आवडते. अभयने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये सांगितले की तो काही दिवसांपूर्वीपासून मुंबई शहर सोडून गोव्याच्या जंगलात राहत आहे. अभय म्हणाला, ‘मी गोव्याच्या जंगलात राहतो, मला ताजी हवा मिळते, मी खूप शिस्तप्रिय आहे. माझ्यासाठी ताजी हवा महत्त्वाची आहे. तिथे राहून मी थोडा वेडा झालोय”
मी निसर्गाशी थोडेसे जोडला गेलो आहे
तो पुढे म्हणाला, ‘माझ्याकडे कोणताही नॉन-स्टिक पॅन नाही. मी कोणत्याही बियांच्या तेलात स्वयंपाक करत नाही. मी एक खास फिल्टर विकत घेतला आहे. आता, जेव्हा मी बाहेर जेवतो तेव्हा मला प्रश्न पडतो की त्यांनी कोणत्या प्रकारचे तेल वापरले असेल? तूप होते की नव्हते, खोबरेल तेल होते का, तव्यावर काही ओरखडे होते का? मी निसर्गाशी थोडेसे जोडला गेलो आहे.”
अभयला प्रसिद्ध होण्याची भीती वाटते
त्याच वेळी, जेव्हा अभय देओलला मुंबईबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला “मी इथे जन्मलो आणि इथेच खूप काळ जगलो आहे. आता तो काळ गेला आहे जेव्हा तुम्हाला FOMO वाटायचं. जेव्हा मी माझ्या जवळच्या व्यक्तीच्या समारंभाला उपस्थित राहू शकत नाही तेव्हाच मला हे जाणवते” असं म्हणत त्याने मुंबईपासून दूर राहण्याचं कारण सांगितलं. अभयला आधीच प्रसिद्धीत राहणे आवडत नाही. उलट अभयला प्रसिद्ध होण्याची भीती वाटत होती. जेव्हा त्याचा ‘देव डी’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याला माहित होते की हा चित्रपट हिट होईल आणि स्टारडमच्या भीतीने तो न्यू यॉर्कला गेलेला. आणि आता त्याने स्विकारलेल्या या मार्गामुळे तर सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.