
Udit Narayan Viral Video: बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक उदित नारायण यांनी आतापर्यंत अनेक हीट आणि रोमँटिक गाणी बॉलिवूडला दिली आहेत. पण आता सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कॉन्सर्टमध्ये उदित नारायण एका महिलेसोबत लिपलॉक करताना दिसले. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त उदित नारायण यांच्या व्हायरल व्हिडीओची चर्चा रंगली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी गायकावर टीका देखील केली.
महिलेसोबत लिपलॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि ज्यामुळे वातावरण तापत असल्याचं लक्षात येताच उदित नारायण यांनी यावर स्वतःची प्रतिक्रिया दिली. आता गायक आणि उदित नारायण यांची मित्र अभिजीत भट्टाचार्य याची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.
Udit narayan, tham jao sir. 😭😭 pic.twitter.com/AtIYhYt6ZX
— Prayag (@theprayagtiwari) January 31, 2025
व्हिडीओ पोस्ट करत अभिजीत भट्टाचार्य कॅप्शनमध्ये म्हणाला, ‘मैं खिलाड़ी तू अनाडी… मेरा खिलाडी दोस्त सिक्सर पे सिक्सर… लव यू ‘, यावर नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अभिजीत भट्टाचार्य याने उदित नारायण यांच्यासोबत पोस्ट केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर वादग्रस्त वातावरण निर्माण झाल्यानंतर व्हिडिओवर उदित नारायण यांची प्रतिक्रियाही समोर आली. ‘आम्हाला पाहिल्यानंतर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचतो. आम्ही सभ्य लोकं आहोत. चाहते फक्त आमच्यावर प्रेम व्यक्त करत असतात. असं असताना या गोष्टीची चर्चा का करायची? गर्दीत बरेच लोकं आहेत आणि आमचे बॉडीगार्ड देखील आहेत. पण चाहत्यांना भेटण्याची संधी मिळतेय असं वाटतं म्हणून कुणी हात पुढे करतात तर कुणी हाताचं चुंबन घेतात… हा सगळा उत्साह आहे. याकडे एवढं लक्ष देऊ नका… असं म्हणत उदित नारायण यांनी स्पष्टीकरण दिलं.