
Abhishek Bachchan – Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. आजही चाहते तितक्याच आवडीने दोघांचे सिनेमे पाहत असतात. ज्याप्रमाणे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव कमावलं आहे, तसं अभिनेता अभिषेक बच्चन याला करता आलेलं नाही. पण त्याने त्याच्या काही सिनेमांमध्ये त्याच्या उत्तम अभिनयाने तो एक मेहनती आणि प्रतिभावान कलाकार आहे हे निश्चितच सिद्ध केलं. अभिषेकचे अनेक सिनेमे फ्लॉप राहिले. पण ‘धूम’ सिनेमान बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली.
नुकताच झालेल्या कपिल शर्मा याच्या शोमध्ये अभिषेक याने मजेदार किस्सा चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ‘धूम’ सिनेमाच्या यशानंतर अभिषेक स्वतःला भारतातील नंबर 1 सुपरस्टार समजू लागला होता. अभिषेक म्हणाला, ‘धूम’ सिनेमाचे निर्माते आदित्य चाप्रा यांनी सिनेमाच्या यशानंतर पार्टी ठेवली होती. पार्टी पूर्ण रात्र रंगली होती. सकाळी जेव्हा मी घरी परतलो. तेव्हा मला स्वतःचा प्रचंड गर्व वाटत होता.
पुढे अभिषेक म्हणाला, ‘घरी पोहोचल्यानंतर मी बेल वाजवली आणि भारताचा नंबर 1 सुपरस्टार घरी आला आहे… असे विचार माझ्या मनात सुरु होते. पण घरी आल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दरवाजा उघडला. त्यांनी नाईट गाऊन घातला होता. चश्मा लावला होता आणि एका हातात न्यूजपेपर होता. त्या पाहिल्याबरोबर माझी नशा उतरली. त्यांना पाहिल्यानंतर कळली की खरा सुपरस्टार कोण आहे….’, अभिषेक बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.
अभिषेक बच्चन गेल्या 2 दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. अनेक छोटे – मोठे रोल करताना अभिषेक दिसला. पण गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन मुख्य अभिनेता म्हणून सिनेमांमध्ये झळकत आहे. अभिषेक याच्या अभिनयाला चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं आहे.
अभिनेता कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो.अभिषेक बच्चन याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने अनेक वर्ष अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला डेट केलं आणि त्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2007 मध्ये आभिषेक आणि ऐश्वर्या यांनी लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला.