AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक… आणखी एका 32 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, दोन आठवड्यापासून घरातच मृतदेह पडून, इंडस्ट्री हादरली

अभिनेत्रीचा दोन आठवड्यांपासून घरात कुजलेल्या अवस्थेत होता मृतदेह, पोलिसांनी घराचा दरवाज तोडला आणि समोर 32 वर्षांची अभिनेत्री...., धक्कादायक घटनेने इंडस्ट्री हादरली

धक्कादायक… आणखी एका 32 वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू, दोन आठवड्यापासून घरातच मृतदेह पडून, इंडस्ट्री हादरली
फाईल फोटो
| Updated on: Jul 09, 2025 | 10:30 AM
Share

आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींचा मृतहदेह घरात कुजलेल्या अवस्थेत आढळले आहेत. आता पुन्हा एका 32 वर्षीय अभिनेत्रीचा मृतदेह गेल्या दोन आठवड्यांपासून घरातच पडून असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या अभिनेत्रीचं निधन झाल्याची माहिती समोर आली ती पाकिस्तानी अभिनेत्री आहे. हुमैरा असगर अली हिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी आढळून आला आहे. ती कराचीतील डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटीमधील एका अपार्टमेंटमध्ये राहत होती, जिथे तिचा मृतदेह सापडला. अभिनेत्रीचा मृत्यू 2 आठवड्यांपूर्वी झाल्याची माहिती समोर येत आहे.

हुमैरा असगर अली पाकिस्तानी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय नाव आहे. फार कमी वयाचा हुमैरा हिने इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. 7 जुलै रोजी अभिनेत्री अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. डीआयजी सय्यद असद रझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अलीचा मृतदेह फेज-VI मधील इत्तेहाद कमर्शियलमधील एका फ्लॅटमधून सापडला. तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. अभिनेत्रीचं निधन 2 आठवड्यांपूर्वी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.’

हुमैरा असगर अली इन्स्टाग्राम

डीआयजी यांच्या माहितीनुसार, स्थानिक न्यायालयाच्या आदेशानुसार गिझरी पोलिस अपार्टमेंट रिकामे करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते. दुपारी 3:15 वाजता पोलिसांनी दार वाजवले तेव्हा कोणीही उत्तर दिले नाही. अशात पोलिसांनी दरवाजा तोडला आणि घरात अभिनेत्रीची मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. अभिनेत्री अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होती. अभिनेत्रीने 2024 पासून भाडं देणं देखील बंद केलं होतं. अशात कोर्टाने अभिनेत्रीला घर रिकामं करण्यासाठी सांगितलं होतं.

सुरुवातीच्या तपासादरम्यान मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. कायदेशीर कारवाईसाठी मृतदेह जिन्ना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सेंटरमध्ये पाठवण्यात आला आहे. पोलिस सर्जन डॉ. सुम्मैया सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शरीर जवळजवळ कुजण्याच्या प्रगत अवस्थेत होते. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.’

हुमैरा असगर अली हिच्या कामाबद्दल सांगायचं ढालं तर, अभिनेत्रीला ‘तमाशा घर’ या रिऍलिटी शोमध्ये पाहण्यात आलं होतं. शिवाय 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जलेबी’ सिनेमात देखील हुमैरा हिने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.