AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आलिया भट्टच्या पर्सनल सेक्रेटरीला अटक, गंभीर आहे प्रकरण

Alia Bhatt: आलिया भट्टच्या पर्सनल सेक्रेटरीने असं काय केलं ज्यामुळे अभिनेत्रीच्या आईने केला FIR दाखल, गंभीर आहे प्रकरण, पर्सनल सेक्रेटरीला अटक... सध्या सर्वत्र आलिया भट्टच्या पर्सनल सेक्रेटरीचीचर्चा

आलिया भट्टच्या पर्सनल सेक्रेटरीला अटक, गंभीर आहे प्रकरण
आलिया भट्ट
| Updated on: Jul 09, 2025 | 9:24 AM
Share

Alia Bhatt: अभिनेत्री आलिया भट्टची फसवणुक करणाऱ्या तिच्या पर्सनल सेक्रेटरीला अटक करण्यात आली आहे. 5 महिने शोध घेतल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्टची सेक्रेटरी वेदिका शेट्टीला बेंगळुरूमधून करण्यात आली अटक. 2021 मध्ये वेदिका शेट्टी आलिया भट्टची पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम पाहत होती. बनावट बिलांच्या माध्यमातून आलियाच्या प्रॉडक्शन हाऊस आणि वैयक्तिक खात्यातून 77 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.

वेदिका शेट्टीविरोधात जुहू पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होता आणि 5 महिन्यापासून पोलीस तिचा शोध घेत होते. पोलिसांनी तिला बेंगळुरूमधून 5 दिवसांच्या ट्रांझिट रिमांडवर आणलं असून तिला कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आलिया भट्टच्या पीएला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. आलियाची आई आणि अभिनेत्री सोनी भट्ट यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला. जुहू पोलिसांनी सुपरस्टार आलिया भट्टची माजी वैयक्तिक सहाय्यक (पीए) वेदिका प्रकाश शेट्टी (32) हिला अटक केली आहे.

भट्ट यांच्या प्रॉडक्शन हाऊस, एटरनल सनशाइन प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि तिच्या वैयक्तिक खात्यांमधून 76,90,892 रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. बेंगळुरूमध्ये अटक करण्यात आलेल्या शेट्टीला पाच दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले मंगळवारी शहरातील न्यायालयात हजर करण्यात आले. मे 2022 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत दोन वर्षांहून अधिक काळ हा घोटाळा सुरु होता.

काय आहे वेदिका शेट्टीचं काम आणि प्रकरण?

वेदिका शेट्टीने एकेकाळी आलिया भट्टसोबत काम केलं होतं आणि तिच्यावर अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याची आणि प्रॉडक्शन हाऊसची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता असं समोर येत आहे की, तिने तिच्या पदाचा गैरवापर करून आलियाच्या प्रॉडक्शन हाऊस आणि वैयक्तिक खात्यांमधून पैसे काढले आहेत. सध्या या प्रकरणी आलिया आणि तिच्या टीमकडून कोणतेही विधान आलेलं नाही आणि आता पोलिस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.

आलिया भट्टचे आगामी सिनेमे

सध्या आलिया आगामी ‘अल्फा’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमात 25 डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमात आलिया हिच्यासोबत अभिनेत्री शर्वरी वाघ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवाय आलिया अभिनेता आणि पती रणबीर कपूर याच्यासोबत दिग्दर्शत संजय लिला भंसाळी यांच्या ‘लव एंड वॉर’ सिनेमात झळकणारी. यासोबतच आणखी काही सिनेमांच्या माध्यमातून आलिया चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल