हात थरथर कापत होते, मी घाबरून ऐश्वर्याच्या ब्लाउजचा हुक…, शुटिंग दरम्यान ऐश्वर्या रायसोबत काय झालेलं?
Aishwarya Rai: हात थरथर कापत होते, मी घाबरून ऐश्वर्याच्या ब्लाउजचा हुक..., शुटिंग दरम्यान असं काय झालं ज्यामुळे बॉबी डार्लिंगचे हात थरथर कापू लागले? सध्या सर्वत्र ऐश्वर्या राय हिची चर्चा...

Aishwarya Rai: बॉबी डार्लिंग जिचं लहानपणी पंकज शर्मा असं होतं. तुम्ही बॉबी डार्लिंग हिचे अनेक सिनेमे पाहिले असतील. लिंगबदल शस्त्रक्रिया केल्यानंतर पंकज शर्माचा बॉबी झाली आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. बॉबी डार्लिंग हिला पहिली भूमिका सुभाष घाई यांच्या ‘ताल’ सिनेमात साकरण्याची संधी मिळाला. बॉबी डार्लिंग हिने ‘ताल’ सिनेमात 25 दिवस शूटिंग केलं.
दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत बॉबी डार्लिंग हिने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याबद्दल मोठा खुलासा केला. शुटिंगच्या वेळी बॉबी डार्लिंग, ऐश्वर्याच्या सौंदर्यावर आकर्षित झाली. बॉबी डार्लिंग म्हणाली, ‘सुभाष घाई यांनी मला ताल सिनेमात काम करण्याची संधी दिली. 25 दिवश शूट केलं. पण एडीट झाल्यानंतर आपल्या हातात काहीही नसतं… मला दिवसाचे 2500 रुपये मिळायचे.’
‘सुभाष घाई यांनी माझी ऑडिशन घेतलं आणि म्हणाले हिला ऐश्वर्याच्या डिझायनरची भूमिका द्या. तेव्हा ‘रमता जोगी’ गाण्याचं शुटिंग सुरु होतं. अनिल कपूर यांनी मला नवीन नाव दिलं. अनिल कपूर म्हणाले, सुभाषजी हिचं नाव आपण दस्तूर ठेवू. आज पासून तू दस्तूर…’
View this post on Instagram
पुढे बॉबी डार्लिंग म्हणाली, ‘गाण्याचं शुटिंग सुरु होतं, जंगल में बोले कोयल… ऐश्वर्या राय उभी होती. सुभाष घाई यांनी सांगितलं, ऐश्वर्याच्या ब्लाउजचा हुक बंद कर… माझे हात थरथर कापत होते.. मला वाटलं काय नशीब आहे. काम हवं होतं तर देवाने थेट ऐश्वर्यासोबत काम करण्याची संधी दिली.’ सध्या सर्वत्र बॉबी डार्लिंगच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
बॉबी डार्लिंग हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, दहावीत असताना तिला याची जाणीव होऊ लागली होती की, जरी तिचं शरीर पुरुषाचं असलं तरी ती आतून एक मुलगी आहे. काही वर्षांपूर्वी बॉबीने लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती. या शस्त्रक्रियेसाठी बॉबी डार्लिंग हिला 10 लाख रुपयांचा खर्च आला.
सर्जरी करण्याच्या जवळपास सहा महिने आधीपासूनच बॉबी डार्लिंग हिला हार्मोनल गोळ्या घ्यावा लागत होत्या. हार्मोन्सच्या या गोळ्या दिवसातून तीन वेळा घ्यावा लागतात. त्यानंतर जानेवारीत बॉबी डार्लिंग हिच्यावर सर्जरी झाली. ही शस्त्रक्रिया जवळपास चार ते पाच तास चालली होती… असा खुलासा बॉबी डार्लिंग हिने केला.
