AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुझ्या स्वयंवरातला वर मीच ठरवणार..; ‘लपंडाव’ मालिकेतल्या अभिनेत्रीची चर्चा

'आई कुठे काय करते' या मालिकेत यशची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुखची पत्नी लवकरच मालिकाविश्वात पदार्पण करणार आहे. 'लपंडाव' या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

तुझ्या स्वयंवरातला वर मीच ठरवणार..; 'लपंडाव' मालिकेतल्या अभिनेत्रीची चर्चा
Krutika Deo and Abhishek DeshmukhImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 16, 2025 | 4:05 PM
Share

सुप्रसिद्ध अभिनेत्री कृतिका देवला आपण अनेक चित्रपटांच्या माध्यमातून भेटलोय. आता स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु होणाऱ्या ‘लपंडाव’ मालिकेतून कृतिका मालिका विश्वात दमदार पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत ती सखी कामत हे पात्र साकारणार आहे. कृतिका देवची ‘लपंडाव’ ही पहिलीवहिली मालिका आहे. आयुष्यातली पहिली गोष्ट ही नेहमी खास असते. त्यामुळे या मालिकेसाठी ती खूपच उत्सुक आहे. ‘राजवाडे अँड सन्स’ या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली कृतिका ही अभिनेता अभिषेक देशमुखची पत्नी आहे. ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेत अभिषेकने अरुंधतीच्या मुलाची भूमिका साकारली होती. कृतिका मूळची पुण्याची असून एस. पी. कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केलंय. ‘हॅपी जर्नी’, ‘हवाईजादा’ यांसारख्या चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारल्या आहेत.

सखी कामत या भूमिकेविषयी सांगताना कृतिका म्हणाली,”‘स्टार प्रवाहसोबतचा माझा पहिला प्रोजेक्ट आहे. त्यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते की इतकं छान पात्र साकारण्याची संधी मला मिळाली. सखी कामत अतिशय श्रीमंत घरातली मुलगी आहे. सगळी सुखं तिच्या पायाशी आहेत मात्र आईच्या प्रेमासाठी ती आसुसलेली आहे. सखीच्या मनातली घालमेल नेमकी काय असेल हे साकारण्याचा माझा प्रयत्न असेल. मालिकेची टीम खूपच छान आहे. प्रेक्षकांना ही मालिका नक्की आवडेल.”

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

सखी श्रीमंत आणि सुखवस्तू कुटुंबातली असली तरी तिला पैश्यांचा अजिबात माज नाहीय. अडचणीत असलेल्या व्यक्तीला ती आवर्जून मदत करते. त्यासाठी आपल्या अत्यंत जवळची गोष्ट द्यायलाही ती मागे पुढे पहात नाही. सखी स्वभावाने अत्यंत गोड असली तरी भावनेच्या भरात तिच्याकडून अनेकदा अतर्क्य निर्णय घेतले जातात आणि मग हट्टाने ते पाळलेही जातात. सखीच्या आयुष्यात एकच खंत आहे ते म्हणजे आईचं प्रेम. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत तिला आईचं प्रेम मिळालं. मात्र बाबा गेल्यानंतर आईनेही तिला दूर केलं. आईसोबत तिचे अध्येमध्ये खटके उडतात. मात्र भांडणाच्या निमित्ताने का होईना पण आई आपल्याशी दोन मिनिटं तरी बोलेल हीच भाबडी आशा तिच्या मनात असते.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.