Russia Ukraine War: ‘मी माझा देश सोडून जाणार नाही’; युद्धकाळात Ukraine मध्ये थांबलेल्या मित्राची अभिनेत्याला चिंता

| Updated on: Mar 23, 2022 | 4:52 PM

रशिया-युक्रेन युद्धाला (Russia Ukraine War) जवळपास महिना होत आला आहे. युक्रेनबाबत आता पुढे काय होणार, असा प्रश्न संपूर्ण जगासमोर आहे. हे युद्ध कधी थांबणार हे सध्या कोणालाच ठाऊक नाही. अशा परिस्थितीत प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता आमिर अली (Aamir Ali) याने त्याच्या युक्रेनमधल्या एका मित्रासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

Russia Ukraine War: मी माझा देश सोडून जाणार नाही; युद्धकाळात Ukraine मध्ये थांबलेल्या मित्राची अभिनेत्याला चिंता
Aamir Ali
Image Credit source: Instagram
Follow us on

रशिया-युक्रेन युद्धाला (Russia Ukraine War) जवळपास महिना होत आला आहे. युक्रेनबाबत आता पुढे काय होणार, असा प्रश्न संपूर्ण जगासमोर आहे. युक्रेनमधल्या भारतीयांना सुखरुप परत आणण्यात यश आलं. मात्र हे युद्ध कधी थांबणार हे सध्या कोणालाच ठाऊक नाही. अशा परिस्थितीत प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता आमिर अली (Aamir Ali) याने त्याच्या युक्रेनमधल्या एका मित्रासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. युक्रेनमध्ये युद्ध सुरू असतानाही त्याचा हा मित्र देश सोडणार नसल्याचं म्हणतोय. कुलदीप कुमार असं आमिरच्या या मित्राचं नाव आहे. कुलदीप हा भारतीय असून त्याने युक्रेनियनशी लग्न केलं आणि गेल्या 25 वर्षांपासून तो कीवमध्ये (Kyiv) आपल्या कुटुंबीयांसोबत राहतोय. कुलदीपला दोन मुलं असून युक्रेनमध्ये तो रेस्टाँरंट चालवतो. मित्राच्या काळजीमुळे दररोज रशिया-युक्रेन युद्धाच्या बातम्यांवर लक्ष ठेवून असल्याचं आमिरने सांगितलं.

आमिरने कुलदीपला अनेकदा देश सोडून भारतात परत येण्यास सांगितलं. मात्र त्यास कुलदीपने साफ नकार दिला. या विषयावरून दोघांमध्ये भांडणही झालं. “हा माझा देश आहे आणि मी हा देश सोडू शकत नाही”, असं कुलदीप आमिरला म्हणाला. “तो हद्दीबाहेर राहत असल्याने सध्या सुरक्षित आहे. मात्र दररोज त्याला तिथे बॉम्बस्फोट आणि सायरनचे आवाज येत असतात, असं तो सांगतो. अशा परिस्थितीतही तो घराबाहेर पडून इतरांची मदतदेखील करतो. किंबहुना त्याने अनेक भारतीयांना तिथून निघण्यास मदत केली आहे. युक्रेनच्या नागरिकांना या युद्धामुळे खूप सहन करावं लागतंय. हे युद्ध लवकरच संपावं, अशी आशा मी व्यक्त करतो”, असं आमिर म्हणाला.

एका मित्राद्वारे कुलदीप आणि आमिर यांची ओळख झाली. या ओळखीचं रुपांतर हळूहळू मैत्रीत झालं. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघं एकमेकांच्या संपर्कात आहेत. “गेल्या 10-15 वर्षांपासूनची आमची ही मैत्री आहे. मी युक्रेनला अनेकदा त्याच्या घरी गेलो. काही वेळा कामानिमित्त तिथं राहिलो. तो देश खूप सुंदर आहे आणि तिथली लोकंसुद्धा खूप चांगली आहेत. या युद्धानंतर त्यांच्या जखमा कशा भरल्या जातील, याचा विचार करूनच मला खूप वाईट वाटतं”, अशा शब्दांत आमिरने भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा:

Samanthaने नाग चैतन्यसोबतचं उरलं सुरलं नातंही संपवलं; यावेळी तिने..

Mumbai: सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरने मुंबईत घेतलं हक्काचं घर