हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना आमीर आणि संजीदाच्या जवळच्या एका व्यक्तीनं सूत्रांशी बोलताना ही माहिती दिली आहे. या दोघांनाही आपल्या खासगी आयुष्याबद्दल चर्चा झालेली आवडत नसल्याचंही देखील म्हटलंय. त्यामुळेच ही बाब कुणालाच कळली नसल्याचं बोललं जातंय. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून आमीर आणि संजीदा विभक्त होणार आहे, अशी कुजबूज सुरु होती. मात्र अधिकृतपणे याबाबत कुणालाच काही माहिती मिळू शकली नव्हती.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनय क्षेत्रात असलेल्या आमीर आणि संजीदा यांना एक दोन वर्षांची मुलगी आहे. तिचं नाव आहे आर्या. सध्या आर्याचा ताबा तिच्या आईकडे असून ती आईसोबत राहत असल्याचंही हिंदुस्थान टाईम्सनं आपल्या वृत्तामध्ये म्हटलंय. दरम्यान, आमचा घटस्फोट झाला असल्याचं या दोघांनीही मान्य केल्याचं समोर आलंय.
View this post on Instagram
आमीर आणि संजीदा दोघंही अभिनय क्षेत्रात काम करतात. 2012 साली त्यांचं लग्न झालं होतं. मात्र 2020 पासून त्यांचा एकमेकांशी वाद सुरु असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर ते दोघंही वेगळे राहू लागले. संजीदा शेख ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिनं क्या होगा निम्मो का या सीरियलमधून आपल्या करियरला सुरुवात केली होती. इतकंच काय, तर नच बलियेच्या तिसऱ्या सीझनमध्ये या जोडीनं भागही घेतला होता आणि ही स्पर्धा जिंकली होती. तर दुसरीकडे आमीरने जाहिरातींमधून आपल्या करीयरला सुरुवात केली होती. तर काही चित्रपटांमध्ये त्यानं छोटे-मोठे रोल केले होते. कहानी घर घर की, या मालिकेतून आमीर घराघरांत पोहोचला होता.
Disha Patani | टायगर श्रॉफच्या शर्टलेस फोटोवर फिदा झाली दिशा पाटनी, कमेंट करत म्हणाली….