AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिद्धार्थ-मितालीच्या आयुष्याची नवी सुरुवात; चाहत्यांना सांगितली आनंदाची बातमी

मायानगरी मुंबईत आपलं हक्काचं घर असावं, असं अनेकांचं स्वप्न असतं. मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) यांनी हे आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. या दोघांनी मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत या दोघांनी चाहत्यांनी ही आनंदाची बातमी सांगितली.

सिद्धार्थ-मितालीच्या आयुष्याची नवी सुरुवात; चाहत्यांना सांगितली आनंदाची बातमी
Mitali Mayekar and Siddharth ChandekarImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 23, 2022 | 4:14 PM
Share

मायानगरी मुंबईत आपलं हक्काचं घर असावं, असं अनेकांचं स्वप्न असतं. मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) यांनी हे आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. या दोघांनी मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे. इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत या दोघांनी चाहत्यांनी ही आनंदाची बातमी सांगितली. ‘नवी सुरुवात, मुंबईत नवीन घर, मुंबईतील पहिलं हक्काचं घर’, असं कॅप्शन देत दोघांनी फोटो पोस्ट केला आहे. या घराचं रेजिस्ट्रेशन (Home in Mumbai) दोघांनी केलं असून त्यानंतरच त्यांनी हा फोटो काढला आहे. या फोटोमध्ये दोघांच्या अंगठ्यावर शाई पहायला मिळतेय. सिद्धार्थ-मितालीने ही आनंदाची बातमी सांगताच नेटकऱ्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. इंडस्ट्रीतील या दोघांच्या मित्र-मैत्रिणींनीही कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.

‘काही खरं नाही’, अशी कमेंट गौरी नलावडेनं केली. तर ‘तुम्हा दोघांनी केलेल्या मेहनतीचं हे फळ आहे, शुभेच्छा’, असं अभिज्ञा भावेनं लिहिलं. कॉमेडियन ओंकार राऊतने मजेशीर कमेंट केली. ‘शुभेच्छा.. आता माझं घर तुझ्या नावावर करायची गरज नाही’, असं त्याने म्हटलंय. स्पृहा जोशी, ऋतुजा बागवे, समीर विद्वांस, अभिजीत खांडकेकर, निपुण धर्माधिकारी, गौरी नलावले, मृण्मयी गोडबोले, मंजिरी ओक, सखी गोखले, भूषण प्रधान, ऋषी सक्सेना, आदिनाथ कोठारे, हृता दुर्गुळे, आरोह वेलणकर, शाल्व किंजवडेकर यांसारख्या कलाकारांनीही मिताली-सिद्धार्थवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सिद्धार्थ-मितालीने फोटो केला पोस्ट-

सिद्धार्थ आणि मितालीचं हे नवीन घर मुंबईत नेमकं कुठे आहे, हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. त्यांनी या घराचा फोटो अद्याप पोस्ट केला नाही. सिद्धार्थ-मितालीने 24 जानेवारी 2021 रोजी पुण्यातील ढेपेवाडा याठिकाणी लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

हेही वाचा:

मटकीला मोड नाय, Oo Antava च्या मराठी व्हर्जनला तोड नाय! ऐकून लोक म्हणाले ‘कितने तेजस्वी लोग है’

‘ज्या ज्या भागात हिंदू अल्पसंख्य होतील, तिथे तिथे..’; The Kashmir Files बद्दल शरद पोंक्षेंचं रोखठोक मत

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.