शूटिंग केलेला कोणताही भाग वगळला जाणार नाही : अमोल कोल्हे

| Updated on: Feb 22, 2020 | 3:04 PM

शूटिंग केलेला कोणताही भाग वगळला जाणार नाही. काय दाखवायचे काय नाही हा सर्वस्वी वाहिनीचा निर्णय असतो, असं अमोल कोल्हे (Amol Kolhe on Swarajya Rakshak Sambhaji Serial) म्हणाले.

शूटिंग केलेला कोणताही भाग वगळला जाणार नाही : अमोल कोल्हे
Follow us on

पुणे : स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांचे हाल दाखवू नयेत, अशी मागणी शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी (Amol Kolhe on Swarajya Rakshak Sambhaji Serial) केली. तसंच आपली मागणी मान्य केल्याचा दावाही खोतकर यांनी केला त्यावर राष्ट्रवादीचे खासदार आणि संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. असं कोणतंही आश्वासन मी दिलेले नाही. शूटिंग केलेला कोणताही भाग वगळला जाणार नाही. काय दाखवायचे काय नाही हा सर्वस्वी वाहिनीचा निर्णय असतो, असं अमोल कोल्हे म्हणाले.

“गेली अडीच वर्षे मालिका सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे, परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे, कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल,” असं खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी म्हटलं.

अर्जुन खोतकर काय म्हणाले?

स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मालिकेतील संभाजीराजेंना अटकेनंतरचा भाग दाखवू नये अशी मागणी अर्जुन खोतकर यांनी केली होती. याला अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संमती दाखवल्याची माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली. “संभाजीराजेंच्या अटकेनंतर त्यांचे जे हाल केले ते आम्हा सैनिकांना बघवणार नाही. त्यामुळं हा भाग वगळण्यात यावा” अशी मागणी खोतकरांनी केली (Amol Kolhe on Swarajya Rakshak Sambhaji Serial) होती.

यावर खासदार कोल्हे यांनी संमती दर्शवली अजून आता ही मालिका त्या ठिकाणीच थांबवण्यात येणार असल्याचा दावा खोतकरांनी केला होता.

सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख

संभाजी मालिका मी आता पाहिली नाही, त्यात काय सुरु आहे आणि अर्जुन खोतकर यांनी काय मागणी केली ती पण माहीत नाही. मी माहिती घेतो. जर मालिकेत काही चुकीचे असेल किंवा मालिकेमुळे काही वादाची परस्थिती निर्माण होत असेल, तर त्यासंबंधी काही तक्रारी सूचना असल्यास निर्णय घेऊ, असं सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी (Amol Kolhe on Swarajya Rakshak Sambhaji Serial) म्हटलं.