
गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dhamendra) यांचे आज सकाळी निधन झालं.गेल्या आठवड्यात रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यावर त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते, तेथेच त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात 2 पत्नी, मुलं, नातवडं असा मोठा परिवार आहे. गेली अनेक वर्ष चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमधील एकाहून एक सुंदर अभिनेत्रींसोबत काम केलं, त्यांच्याशी मोठ्या पडद्यावर रोमान्स केला.
धर्मेंद्र यांची कारकीर्द
तसं तर त्यांनी विविध रोमँटिक चित्रपटात सर्वोत्तम काम केलं. त्यात त्यांनी अनेक सुंदर कपडेही घातले. पण पिवळ्या रंगाचा शर्ट त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचा होता, जो त्यांनी तीन चित्रपटांमध्ये परिधान केला होता. तो शर्ट धर्मेंद्र यांच्यासाठी खूप लकी होता. 70 आणि 80 चे दशक हे बॉलिवूडचा सुवर्णकाळ मानला जातं. त्या काळात असे अनेक चित्रपट बनले जे कधीही विसरता येणार नाहीत. धर्मेंद्र हे त्या काळातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक होते. त्यांना बॉलीवूडचा ही-मॅन म्हणून ओळखले जात असे. त्यांच्या रोमँटिक तसेच अॅक्शन भूमिकांसाठी ते चित्रपट निर्मात्यांचे आवडते होते.
धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. त्यांचा पहिला चित्रपट फ्लॉप ठरला, पण धर्मेंद्र यांनी हिंमत गमावली नाही. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांनी फुल और पत्थर या चित्रपटातून सर्वांना प्रभावित केले. त्यानंतर धर्मेंद्र यांनी शोले, आँखे आणि कर्तव्य यासारख्या चित्रपटांमध्ये काम करून स्वतःचं नाव प्रस्थापित केलं. काही चित्रपटांमध्ये त्यांनी एक शर्ट घातला जो त्यांच्यासाठी खूप भाग्यवान ठरला.
हा ठरला लकी शर्ट
धर्मेंद्र यांनी 1968 ते 1970 दरम्यान तीन प्रमुख चित्रपटांमध्ये काम केले, ते चित्रपट म्हणजे, मेरे हमदम मेरे दोस्त, आया सावन झुमकर आणि जीवन मृत्यु. या तिन्ही चित्रपटांमध्ये एक समान धागा होता त्यांचा पिवळा पट्टे असलेला शर्ट.
‘जीवन मृत्यू’ या चित्रपटात धर्मेंद्र राखीसोबत रोमान्स करताना दिसले होते. या चित्रपटातील एक गाणं आहे ज्यामध्ये ते राखीसोबत रोमान्स करताना पिवळा शर्ट घालतात. ‘झिलमिल सीतारों का’ असं त्या गाण्याचे शीर्षक आहे. त्यानंतर धर्मेंद्र आणि आशा पारेख यांचा ‘आया सावन झूम के आया’ हा चित्रपट आला, त्यामध्येही त्यांनी तोच पिवळा शर्ट घातलेला होता. हा शर्ट धर्मेंद्रसाठी लकी मानला जातो. त्यांचा हा चित्रपटही खूप यशस्वी ठरला. तसेच धर्मेंद्र आणि शर्मिला टागोर यांचा रोमान्स पाहणे सर्वांना खूप आवडले. त्यांनी ‘मेरे हमदम मेरे दोस्त’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात एक गाणे होते, ज्यामध्ये त्यांनी तोच पिवळा शर्ट घातला होता. हे तिन्ही चित्रपट अतिशय यशस्वी ठरले होते.