
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे, त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनाचं वृत्त समोर येताच बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी दाखल झाले आहेत.धर्मेंद्र यांनी 300 पेक्षा अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे.धर्मेंद्र यांचा जन्म 1935 मध्ये पंजाबच्या नसराली या छोट्याशा गावामध्ये झाला, मात्र त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, त्यांचा जन्म एका छोट्या गावामध्ये झाला होता, परिस्थिती बिकट होती, मात्र अशाही परिस्थितीमध्ये धर्मेंद्र यांनी हार मानली नाही, त्यांनी सुरुवातील काही पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलं, त्यानंतर त्यांना बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळाली, त्यानंतर धर्मेंद्र यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीला दिले. या क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेला शोले हा चित्रपट तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. या चित्रपटामुळेच धर्मेंद्र यांना विरू अशी नवी ओळख मिळाली.
दरम्यान आज धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. मात्र अजूनही त्यांचा एक चित्रपट रिलीज होणं बाकी आहे, त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून आता आपल्याला पुन्हा एकदा धर्मेंद्र यांचा अभिनय पहाण्याची संधी मिळणार आहे. ‘इक्कीस’ असं या चित्रपटाचं नाव आहे, जो 25 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं एक पोस्टर देखील समोर आलं आहे, या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेमध्ये आहे, तो 1971 च्या भारत -पाकिस्तान युद्धातील हिरो ठरलेल्या अरुण खेत्रपाल यांची भूमिका करणार आहे, तर धर्मेंद्र या चित्रपटामध्ये अरुण खेत्रपाल यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
धर्मेंद्र यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहात्यांना मोठा धक्का बसला आहे, काही दिवसांपूर्वीच त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर ते त्यामधून बरे झाले होते. अखेर त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे.