Dharmendra Died : अजरामर धर्मेंद्र! विरूचे 10 चित्रपट आयुष्यात एकदातरी पाहाच, अभिनय पाहून तुम्ही…

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने बॉलिवुड विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी अेक बड्या चित्रपटांत काम केलेले आहे. त्यांच्या अनेक भूमिका या अजरामर झाल्या आहेत.

Dharmendra Died : अजरामर धर्मेंद्र! विरूचे 10 चित्रपट आयुष्यात एकदातरी पाहाच, अभिनय पाहून तुम्ही...
dharmendra death
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2025 | 2:54 PM

Dharmendra Passed Away : भारतीय सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्यावर आज विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त ऐकून सिनेसृष्टीतून दु:ख व्यक्त केले जात आहे. धर्मेंद्र यांच्या जाण्याने भारतीय सिनेसृष्टीची मोठी हानी झाली आहे, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांचे हे दहा चित्रपट तर आयुष्यात एकदातरी पाहिलेच पाहिजेत.

शोले

रमेश शिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला आणि 1975 साली आलेला शोले हा चित्रपट धर्मेंद्र यांना वेगळी ओळख देऊन गेला. त्यांनी या चित्रपटात केलेली भूमिका चांगलीच अजरामर झाली. याच चित्रपटापासून त्यांना विरू असे आदराने म्हटले जाऊ लागले.

चुपके चुपके

चुपके-चुपके ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला आणि 1975 साली आलेला चुपके चुपके हा चित्रपटही धर्मेंद्र यांच्या अभिनयामुळे चांगलाच गाजला. या चित्रपटात त्यांनी या चित्रपटात परिमल त्रिपाठी हे पात्र साकारले होते.

द बर्निंग ट्रेन

धर्मेंद्र यांचा द बर्निंग ट्रेन हा चित्रपटही चांगलाच गाजला. या चित्रपटात त्यांनी विनोद खन्ना, मालिनी, जितेंद्र, परवनी बाबी, नितू सिंह या अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली होती.

धरम वीर

धरम वीर हा चित्रपट 1977 साली आला होता. या चित्रपटात त्यांनी वीर हे पात्र साकारले होते. या चित्रपटात त्यांनी प्राण, जितेंद्र, रंजित यासारख्या कसलेल्या अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली होती.

रॉकी और राणी की प्रेम कहाणी

अलिकडेच रणवीरसिंह आणि आलिया भट्ट यांचा रॉकी और राणी की प्रेमकहाणी हा चित्रपट आला होता. या चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका केली होती. या चित्रपटात शबाना आझमी यांच्यासोबत त्यांची केमिस्ट्री जुळून आली होती.

हकिकत

भारत-चीन युद्धातील एका भारतीय सैनिकाची कथा हा या चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे. या चित्रपटात धर्मेंद्र प्रथमच सैनिकाच्या भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट 1964 साली प्रदर्शित झाला होता.

फुल और पथर

हा चित्रपट 1966 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात धर्मेंद्र अॅक्शन हिरो म्हणून समोर आले होते. या चित्रपटात मीना कुमार त्यांच्यासोबत होती.

सत्यकाम

हा चित्रपट 1969 साली प्रदर्शित झाला होता. शर्मिला टागोर, संजिव कुमार यासारख्या कलाकारांसोबत धर्मेंद्र यांनीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली होती.

मेरा गाव मेरा देश

या चित्रपटात धर्मेंद्र यांच्याोसबत विनोद खन्ना, आशा पारेख यासारखे कलाकार होते. हा चित्रपट 1971 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गीत आजही तेवढ्याच आवडीने ऐकले जातात.

चरस

अॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडीने ओपप्रोत असलेला चरस हा चित्रपट 1976 साली आला होता. हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. धर्मेंद्र यांनी या चित्रपटात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा भंडाफोड करणाऱ्या एका व्यक्तीची भूमिका केलेली आहे.