AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेता नसतो तर..; बॉलिवूड सुपरस्टार्स ‘या’ क्षेत्रात करत असते काम, काहींची तर भन्नाट उत्तरं

फिल्म इंडस्ट्रीत काम करत नसते तर या अभिनेत्यांनी काय केलं असतं, या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. काहींनी तर त्यावर भन्नाट उत्तरं दिली आहे. कोणी दूध विकलं असतं, तर कोणी टॅक्सी चालवली असती.. जाणून घ्या कलाकारांची उत्तरं..

अभिनेता नसतो तर..; बॉलिवूड सुपरस्टार्स 'या' क्षेत्रात करत असते काम, काहींची तर भन्नाट उत्तरं
bollywood actors
| Updated on: Nov 02, 2025 | 1:47 PM
Share

बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करून अनेकांना पैसा, प्रसिद्धी मिळाली. काहींनी तर बॉलिवूडमध्ये असा जम बसवला की, त्यांची जागा कोणीच कधी घेऊ शकत नाही. परंतु या क्षेत्रात येण्यापूर्वी काहींची वेगळी स्वप्नं होती, तर काही जण वेगळ्या क्षेत्रात नोकरीसुद्धा करत होते. इंडस्ट्रीत येण्यामागची प्रत्येक कलाकाराची एक वेगळी कहाणी आहे. यात असेही काही कलाकार आहेत, जे अभिनयक्षेत्राव्यतिरिक्त इतर कुठल्याही ठिकाणी काम करत असल्याची स्वत:ची कल्पना करू शकत नाही. आपण या क्षेत्रासाठीच बनलोय, असं त्यांचं स्पष्ट मत आहे. अमिताभ बच्चन, जितेंद्र, कुमार सानू, सनी देओल, आमिर खान, अमरीश पुरी, अनुपम खेर यांसारख्या कलाकारांनी याबाबत आपलं मत मांडलंय. अभिनेता नसतो तर काय केलं असतं, या प्रश्नाचं त्यांनी काय उत्तर दिलंय, ते वाचा..

अमिताभ बच्चन – अभिनेता नसतो तर मी अलाहाबादमध्ये दूध विकत असतो.

टिन्नू आनंद- मी टॅक्सी ड्राइव्हर झालो असतो.

जितेंद्र- मी आयुष्यातील इतर सगळ्या गोष्टींमध्ये खूप वाईट आहे. मी कॉलेजमध्येही नापास होतो. मला बीएससीमध्ये 48 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळू शकले नव्हते. त्यामुळे मी कोणत्या क्षेत्रात करिअर केलं असतं, हे मलाच माहीत नाही. मी या फिल्म इंडस्ट्रीचा खूप आभारी आहे की त्यांनी मला इथे स्वीकारलं आणि आपलंसं केलं.

कुमार सानू मी याआधी तबलावादक होतो, त्यामुळे जर गायक झालो नसतो तर कदाचित तबलावादकच बनलो असतो.

सनी देओल- मी स्पोर्ट्समध्ये माझं नशीब आजमावलं असतं.

आमिर खान- मी कदाचित शिक्षक बनलो असतो.

अमरीश पुरी- अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्याआधी मी सरकारी नोकरी करत होतो. त्यामुळे कदाचित तीच नोकरी मी पुढे केली असती.

गुलशन ग्रोवर- माझ्या मते मी तर मेलोच असतो. कारण मी फक्त चित्रपटांसाठीच बनलोय. जर मी या फिल्म इंडस्ट्रीत काम करू शकत नसलो किंवा अभिनेता नसतो तर मी जिवंतच राहू शकलो नसतो.

प्राण- अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी मी ‘टाइम्स ऑफ इंडिया’मध्येच कामाला होतो.

अनुपम खेर- मी कदाचित हाती काम नसलेला अभिनेता बनलो असतो.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?