भिकारी असल्यासारखं वाटलं…, जेव्हा गोविंदाने मांडीवर घेतला स्वतःच्याच मुलीचा मृतदेह
Govinda Daughter: चार महिन्याच्या लेकीला गमावल्यानंतर गोविंदाच्या आयुष्यात कोसळला दुःखाचा डोंगर, अभिनेता म्हणाला, 'तेव्हा भिकारी असल्यासारखं वाटलं...', कसं झालं गोविंदाच्या मुलीचं निधन?

आई कितीही जवळची असली तरी देखील बापावर मुलींचं वेगळं प्रेम असतं. बाप आणि मुलीचं नातं फार वेगळं असतं. एकामुलीसाठी बाप सर्वकाही असतो. तर बापासाठी लेक त्यांच्या जीवनातील आधार असतो. लेकीला थोडं जरी काही झालं तर, बापाच्या डोळ्यात पाणी येतं. पण अभिनेता गोविंदा याने तर स्वतःच्या चार महिन्यांच्या मुलीला गमावलं आहे. जेव्हा चार महिन्यांच्या मुलीचा मृतदेह अभिनेत्याच्या स्वतःच्या मांडीवर घेतला. तेव्हा गोविंदाला संपत्ती, प्रसिद्धी सर्वकाही असून देखील भिकारी झाल्यासारखं वाटलं.
स्वतः गोविंदाने लेकीचा मृत्यू कसा झाला याबद्दल सांगितलं होतं. लेकीच्या मृत्यूनंतर गोविंदाच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला. आज गोविंदा पत्नी, एक मुलगा आणि एका मुलीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण आज ती मुलगी असती तर, गोविंदा दोन मुलींचा आणि एका मुलाचा बाप असता.
गोविंदा आणि सुनीता यांची एक मुलगी देखील होती. पण तिचं चार महिन्यात निधन झालं. ‘जीना इसी का नाम है’ शोमध्ये चिमुकलीच्या निधनाबद्दल सांगितलं. ‘लेकीचं निधन झालं तेव्हा दुःखाचा डोंगर आमच्यावर कोसळला होता. माझी मुलगी प्रीमॅच्योर जन्माला आली. ती खूप कमकुवत होती, तिचे फुफ्फुस विकसित झाले नव्हते. म्हणून तिच्या मृत्यूनंतर माझ्या आईने मला गुजरातमधील नर्मदा नदीवर जाऊन तिचे त्या नदीत विसर्जन करण्यासाठी सांगितलं. ‘
गोविंदाने कधीच आईचं म्हणणं टाळलं नाही. याचा खुलासा खुद्द सुनीता हिने केला. आईने सांगितल्यानंतर गोविंदा मुलीचं मृतदेह हातात घेतला आणि नवरात्रीच्या 9 व्या दिवशी नदीच्या तटावर पोहोचला. याच दरम्यान, गोविंदाने रस्त्यावर एका भिकारी महिलेला तिच्या बाळासोबत पाहिलं. जी स्वतःच्या बाळाला कडेवर घेऊन भीक मागत होती. भीक मागण्यासाठी गोविंदाच्या गाडीवर हात मारला. पण अभिनेत्याच्या मृत मुलीला पाहिल्यानंतर त्या महिलेने स्वतःच्या बाळाला घट्ट मिठी मारली आणि बाजूली झाली.
तेव्हा गोविंदा म्हणाला, ‘तेव्हा मला असं वाटलं मी भिकारी आहे आणि ती महिला मालकीण… हेच आयुष्य आहे… तेव्हा मला एका भिकारीपेक्षा देखील अत्यंत वाईट वाटत होतं. कधीकधी, गरिबी आणि असहाय्यतेतही, तो बादशाहपेक्षा चांगले दाखवतो.’ आजही, गोविंदा त्याच्या मुलीच्या मृत्यूचे दृश्य आठवून थरथर कापतो. त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं, आजही तो त्याच्या मुलीची आठवण करून एकटाच रडतो.
अभिनेता गोविंदा आज बॉलिवूडमध्ये पूर्वीप्रमाणे सक्रिय नसला तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता घटस्फोटामुळे चर्चेत आहे. गोविंदा आणि सुनीता गेल्या अनेक वर्षांपासून वेगळे राहतात… याचा खुलासा खुद्द अभिनेत्याच्या पत्नीने केला होता.
