
सिनेसृष्टीत कधी काय होईल हे सांगता येत नाही. या क्षेत्रात असे काही कलाकार आहेत, ज्यांनी गुपचूप लग्न उरकलं आहे. तर काही सेलिब्रिटी असे आहेत ज्यांनी लग्नानंतर घटस्फोटही घेतला आहे. अभिनेत्रींच्या प्रेग्नेन्सीबाबत तर नेहमीच चर्चा रंगलेली असते. दरम्यान, आता एका अभिनेत्याने लग्न झाल्यानंतर अवघ्या काही तासांत पत्नी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीचा अभिनेता तथा शेफ माधमपट्टी रंगराज याने सेलिब्रिटी स्टायलिस्ट जॉय क्रिजिल्दा हिच्यासोबत लग्न केले आहे. लग्न झाल्यानंतर पुढच्याच काही तासांत या जोडीने त्यांना लवकरच बाळ होणार असल्याचे जाहीर केले आहे. मधमपट्टी आणि जॉय यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
सोशल मीडियावर या कपलला चांगलंच ट्रोल केलं जातंय. जॉय क्रिजिल्दा ही सहा महिन्यांची गर्भवती आहे. 2025 साली लवकरच या कपलला बाळ होणार आहे. याबाबतची घोषणा खुद्द शेफ माधमपट्टी रंगराज यांनेच एक्स या सोशल मीडिया माध्यमावर केली आहे. या घोषनेनंतर माधमपट्टी याच्या पत्नीनेही इन्स्टाग्रावर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये तिने लवकरच आम्हाला बाळ होणार असल्याचे तिने सांगितले. तसेच मी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचेही तिने या पोस्टमध्ये सांगितले आहे. तिने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये जॉय क्रिजिल्दा हिचे बेबी बंपही दिसत आहे. क्रिजिल्दा या फोटोमध्ये तिच्या नवऱ्यासोबत दिसत आहे.
माधमपट्टी रंगराज हा दाक्षिणात्त्य सिनेसृष्टीतील मोठा अभिनेता आहे. रंगराज याने मेहंदी सर्कस याव्यतिरिक्त टीव्ही शो कूकू विथ कोमालीमध्ये काम केलेले आहे. माधमपट्टी हा प्रसिद्ध शेफ आहे. बंगळुरूमध्ये माधमपट्टीचे अनेक रेस्टॉरंट्स आहेत. तसेच तो मोठ्या लग्नात केटरिंगच्या ऑर्डर्सही घेतो. दरम्यान, त्यांच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जातंय. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.