महेश मांजरेकर खिशात ठेवतात चक्क ही चटणी, लेकीने केला मोठा खुलासा, म्हणाली, त्यांच्या खिशात कायम…

महेश मांजरेकर यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. आता त्यांच्या लेकीने देखील चित्रपटांमध्ये धमाका करण्या सुरूवात केली. आता नुकताच महेश मांजरेकर यांची लेक सई हिने वडिलांबद्दल मोठा खुलासा केला.

महेश मांजरेकर खिशात ठेवतात चक्क ही चटणी, लेकीने केला मोठा खुलासा, म्हणाली, त्यांच्या खिशात कायम...
Mahesh Manjrekar and Saiee Manjrekar
| Updated on: Nov 07, 2025 | 1:36 PM

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर कायमच चर्चेत असतात. फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी धमाकेदार भूमिका केल्या आहेत. कधी ते अभिनेत्याच्या भूमिकेत असतात तर कधी दिग्दर्शकाच्या. महेश मांजरेकर यांची लेक सई मांजरेकर हिने देखील बॉलिवूडमध्ये पर्दापण केलंय. सलमान खानसोबत काम करण्याची थेट संधी तिला मिळाली. वडिलांच्या पावलावर पाऊस टाकत ती काम करत आहे. महेश मांजरेकर यांचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. आता नुकताच वडील महेश मांजरेकर यांच्याबद्दल लेक सईने मोठा खुलासा केला. सईचे बोलणे ऐकून अनेकांनी भुवया उंचावल्या. वडील महेश मांजरेकर आपल्या खिशात कशाची पुडी ठेवतात, याबद्दल तिने चक्क सांगितले आहे.

सई मांजरेकर हिने नुकताच अमर उजालाला एक मुलाखत दिलीये. सईने मुलाखतीत वडिलांबद्दल खुलासा केला. सईने म्हटले की,  मी माझ्या वडिलांकडून अनेक गोष्टी शिकले आहे आणि लक्षातही ठेवल्या आहेत. माझे वडील जेंव्हाही भारताबाहेर जातात, त्यावेळी कायमच ते त्यांच्या खिशात एक लसणाच्या चटणीची पुडी ठेवतात. त्यांचे म्हणणे आहे की, बाहेरील जेवणाला चव नसते, म्हणून त्यांच्या खिशात कायम लसणाच्या चटणी असते.

आता त्यांची ही सवय मला देखील लागली आहे. मी देखील माझ्या बॅगमध्ये मिरची किंवा एखादी चटणी ठेवते म्हणजे ठेवतेच. पहिल्यांदाच वडिलांच्या एका सवयीबद्दल सांगताना सई मांजरेकर ही दिसली आहे. सई मांजरेकर हिने कमी वेळात एक वेगळी ओळख नक्कीच मिळवली आहे. गेल्या काही दिवसांपासून सई तिच्या डेटिंगच्या बातम्यांमुळेही चर्चेत आहे. साई साजिद नाडियादवालाचा मुलगा सुभान नाडियाडवालाला डेट करत असल्याचे सांगितले जाते.

सई अनेकदा सुभान नाडियाडवाला याच्यासोबत डिनर डेटवर दिसली आहे. मात्र, कायमच डेटिंगच्या चर्चांवर सई भाष्य करणे टाळते. सई मांजरेकरने प्रभुदेवाच्या दबंग 3 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सई सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सई मांजरेकर कायमच दिसते. त्यामध्येच तिने वडिलांंबद्दल मोठा खुलासा केला.