महेश मांजरेकरांची लेक ‘या’ प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाच्या मुलाला करतेय डेट

सलमान खानमुळे सईची (Sai Manjrekar) त्या दिग्दर्शकाच्या मुलाशी ओळख झाल्याचं कळतंय.

महेश मांजरेकरांची लेक 'या' प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाच्या मुलाला करतेय डेट
Sai Manjrekar
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Feb 22, 2022 | 11:59 AM

अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांची मुलगी सई मांजरेकर (Sai Manjrekar) हिने ‘दबंग ३’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटातून सईने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. सई सोशल मीडियावरही सक्रिय असते. अल्पावधीतच सईचा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच सईच्या डेटिंग लाईफबद्दल सध्या जोरदार चर्चा आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाला सई डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. ‘पिंकविला’ या वेबसाइटने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानमुळे सईची त्या दिग्दर्शकाच्या मुलाशी ओळख झाल्याचं कळतंय. प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते आणि दिग्दर्शक साजिद नाडियादवालाचा (Sajid Nadiadwala) मुलगा सुभान नाडियादवालाला (Subhan Nadiadwala) सई डेट करत आहे.

बॉलिवूडमध्ये साजिद नाडियादवाला हे फार मोठं नाव आहे. नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेन्मेंट या निर्मिती कंपनीचे ते मालक आहेत. आता वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत सुभानसुद्धा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचं कळतंय. सलमान खानमुळे सुभान आणि सई यांची भेट झाली. विशेष म्हणजे सईचे वडील महेश मांजरेकर आणि सुभानचे वडील साजिद नाडियादवाला या दोघांसोबत सलमानची चांगली मैत्री आहे. त्यामुळे अनेकदा कुटुंबीयांच्या भेटीगाठीदरम्यान सुभान आणि सईची मैत्री झाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar)

सुभान आणि सईच्या मैत्रीचं रुपांतर आता प्रेमात झालं असून दोन्ही कुटुंबीयांना याबद्दलची माहिती असल्याचं म्हटलं जात आहे. सई किंवा सुभानने याबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मांजरेकर आणि नाडियादवाला कुटुंबाचेही चांगले संबंध असून सई आणि सुभान लवकरच रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर करणार असल्याचं समजतंय.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें