
अभिनेत्री शेफाली हिच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. 27 जून रोजी रात्री अचानक शेफालीला पती पराग त्यागी याने रूग्णालयात दाखल केले आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शेफालीच्या निधनानंतर विविध चर्चा रंगल्या. घरी सत्यनारायणाची पूजा ठेवल्याने दिवसभर तिने उपवास पकडला आणि रात्री फ्रीजमधील अन्न गरम करून खाल्ल्यानंतर तिला अचानक त्रास होण्यास सुरूवात झाली आणि काही मिनिटांमध्ये तिने जगाचा निरोप घेतला. शेफालीच्या निधनाचा सर्वात मोठा धक्का जर कोणाला बसला असेल तर तो तिचा पती आणि अभिनेता पराग त्यागी याला बसला. तो क्षणोक्षणी तिच्या आठवणीत भावूक होतो. परागने स्वत:चे केलेले हाल पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला.
आता नुकताच पराग त्यागी याने सोशल मीडियावर काही फोटो शेफालीचे शेअर केले. करवा चाैथच्या दिवशी पत्नीच्या आठवणीत तो चांगलाच व्याकूळ झाला. यासोबतच त्याने एक अत्यंत भावूक अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली, ज्याने चाहते तणावात आली. तुझ्याशिवाय मी श्वास घेऊ शकत नसल्याने त्याने म्हटले. हेच नाही तर मला तुझ्याकडे बोलाव असेलही परागने आपल्या पोस्टमध्ये म्हटल्याचे दिसत आहे.
पराग त्यागी याने शेफालीच्या आठवणीत शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, मी नेहमीच तुझी वाट बघेल. जरी मला स्वर्गात यावे लागले तरीही. जर यदा कदाचित मी तुला शोधू शकलो नाही तर मी तुला विनंती करेल की, तू मला शोध.. मी तुला आपली वचने आणि प्रतिज्ञा आठवण करून देतो की, तू माझी आहेस. माझ्यासाठी काहीच महत्वाचे नाही की, काय घडले. माझे प्रेम फक्त कायमच तू राहशील.
माझ्यासाठी अजिबात महत्वाचे नाही की, ते काय म्हणतील. तू माझ्यासाठी नेहमीच ती राहशील जिचे मी काैतुक करतो. मी फक्त तुझी वाट बघेल. मी तुला तिथेच मिळेल, पण मला आता वाट बघता येत नाहीये. प्लीज जर शक्य असेल तर मला लवकर तिथे बोलाव. मी तुझ्याशिवाय श्वास देखील घेऊ शकत नाहीये. माझी परी..माझी गुंडी…आता पराग त्यागी याची ही पोस्ट पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसलाचे बघायला मिळत आहे.