AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

R Madhavan  | आमीर खाननंतर आर. माधवनलाही कोरोनाची लागण, ‘ऑल इज वेल’ म्हणत शेअर केली पोस्ट!

अभिनेता आमीर खान याला कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताला दिवस उलटतोच, की आता त्याचा मित्र आणि अभिनेता आर. माधवन (R Madhavan ) यालाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचे कळते आहे. माधवनने स्वतः ट्विट करत आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे

R Madhavan  | आमीर खाननंतर आर. माधवनलाही कोरोनाची लागण, ‘ऑल इज वेल’ म्हणत शेअर केली पोस्ट!
आमीर खान आणि आर. माधवन'
| Updated on: Mar 25, 2021 | 4:22 PM
Share

मुंबई : देशभरात कोरोनाची प्रकरणे सतत वाढतच आहेत. दररोज हजारो लोक या विषाणूला बळी पडत आहेत. गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमधील अनेक कलाकार या विषाणूच्या विळख्यात अडकले आहेत. बॉलिवूड अभिनेता आमीर खान याला कोरोनाची लागण झाल्याच्या वृत्ताला दिवस उलटतोच, की आता त्याचा मित्र आणि अभिनेता आर. माधवन (R Madhavan ) यालाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचे कळते आहे. माधवनने स्वतः ट्विट करत आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे (Actor R Madhavan tested corona positive share post on social media).

यावेळी व्हायरसने आम्हाला पकडलं!

माधवनने एका मजेदार ट्विटद्वारे चाहत्यांना आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याबद्दल माहिती दिली आहे. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. आमीर खान आणि माधवन यांनी ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाचे छायाचित्र शेअर करताना माधवनने लिहिले ‘फरहानला नेहमीच रँचोच्या मार्गावर पुढे जायचे होते. आणि व्हायरस नेहमीच आमच्यामागे होता. पण यावेळी त्याने आम्हाला पकडले. पण, सर्व काही ठीक आहे आणि मी लवकरच कोरोनातून बरा होईन. तथापि, ही अशी जागा आहे, जिथे आम्ही राजूला येऊ देणार नाही. तुमच्या सर्व प्रेमाबद्दल धन्यवाद. मी आता बरा होतो आहे’.

पाहा पोस्ट

आमीर खानलाही कोरोनाची लागण

अभिनेता आमीर खान गेल्या काही दिवसांपासून सतत कामात व्यस्त होता. आमीरने बुधवारी (25 मार्च) तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. त्याने स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे. आमीर कोरोना पॉझिटिव्ह असल्याने, त्याचे कामही बंद झाले आहे. आता तो यातून पूर्णपणे बरा झाल्यानंतर आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग अर्थात ‘लालासिंग चड्ढा’ला पुन्हा सुरूवात करणार आहे (Actor R Madhavan tested corona positive share post on social media).

अनेक कलाकारांना कोरोनाची लागण

आमीर खानच्या आधी अभिनेता कार्तिक आर्यनने एका पोस्टद्वारे कोरोनाची लागण झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्याच्या संपूर्ण टीमची कोरोन चाचणीसाठी घेण्यात आली आहे. रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, संजय लीला भन्साळी, वरुण धवन, नीतू सिंग यांच्यासह अनेक कलाकारांना या विषाणूची लागण झाली आहे. यातील काहींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

बॉलिवूडकरांनी घेतला लसीचा डोस

एकीकडे कोरोनाची प्रकरणे वाढत असताना बॉलिवूड कलाकारांनीही कोरोनाची लस घेण्यास सुरुवात केली आहे. सलमान खान, राकेश रोशन, धर्मेंद्र, अनुपम खेर, संजय दत्त यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे, तर माधवनने अलीकडेच आपल्या आगामी ‘रॉकेट्री – द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात शाहरुख खान एका कॅमियोमध्ये दिसणार आहे.

(Actor R Madhavan tested corona positive share post on social media)

हेही वाचा :

Aamir Khan Corona | अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण

Malaika Arora : मलायका अरोराला अरबाज खानकडून मिळालं खास गिफ्ट, व्हिडीओ केला शेअर

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.