Ranveer Singh: सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेता रणवीर सिंग झाला भावूक …

आज मी जो काही आहे, ते माझ्या आई-वडिलांमुळे आणि दीदींमुळे आहे. तो माझा देव आहे आणि मी जे काही करतो ते माझ्या देवासाठी करतो. माझ्या घरात लक्ष्मी आहे.

Ranveer Singh: सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेता रणवीर सिंग  झाला भावूक ...
Ranveer Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 10, 2022 | 6:33 PM

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh)त्याच्या उत्कृष्ट अभिनयासोबतच त्याच्या फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. अलीकडेच, 67 व्या फिल्मफेअर(Filmfare) पुरस्कार 2022 मध्ये ’83’ चित्रपटासाठी अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर रणवीर खूप भावूक झालेला पाहायला मिळाले आहे. अभिनेत्याने त्याचा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया(Social media) अकाउंटवर शेअर केला आहे.रणवीर सिंगने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये करण जोहर सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी रणवीर सिंगचे नाव घेत असल्याचे दिसत आहे. यानंतर रणवीर स्टेजवर येतो आणि विजयी भाषण देतो. मात्र यावेळी तो आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि रडू लागला.

रणवीर सिंगचे भावनिक भाषण

या व्हिडीओमध्ये रणवीर म्हणतोय ‘माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे, त्याची मला अपेक्षा नव्हती. मी हे करत आहे आणि तुमच्या सर्वांसमोर उभा आहे, यावर माझा विश्वासच बसत नाही. मी अभिनेता झालो आहे. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. हा चमत्कार आहे.’ यापुढे रणवीर सिंग म्हणतो, ‘सर्वात मोठ्या धन्यवाद  मी माझ्या प्रेक्षकांचे आभार मानू इच्छितो. माझ्या प्रवासाचा एक भाग असल्याबद्दल धन्यवाद. आज मी जो काही आहे, ते माझ्या आई-वडिलांमुळे आणि दीदींमुळे आहे. तो माझा देव आहे आणि मी जे काही करतो ते माझ्या देवासाठी करतो. माझ्या घरात लक्ष्मी आहे आणि हे माझे रहस्य आहे.’

 

यानंतर रणवीर सिंग दीपिका पदुकोणला स्टेजवर आणतो आणि म्हणतो रणवीर सिंग पॉवर्ड बाय दीपिका पदुकोण. रणवीर सिंगचे भावनिक भाषण आणि दीपिकावरील प्रेम पाहून चाहतेही खूप खुश झाले. या व्हिडिओवर केवळ चाहतेच नाही तर सेलिब्रिटीही कमेंट करत आहेत.