AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाक्षी सिन्हा हिच्या नव्या नावाबद्दल झहीर इक्बालकडून मोठा खुलासा, अखेर लग्नानंतर अभिनेत्रीचे नाव…

Sonakshi Sinha and Zaheer Iqbal marriage : शत्रुघ्न सिन्हा यांची लेक आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने 23 जून 2024 रोजी झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. सात वर्षे डेट केल्यानंतर सोनाक्षी सिन्हाने झहीरसोबत लग्न केले.

सोनाक्षी सिन्हा हिच्या नव्या नावाबद्दल झहीर इक्बालकडून मोठा खुलासा, अखेर लग्नानंतर अभिनेत्रीचे नाव...
Sonakshi Sinha and Zaheer Iqbal
| Updated on: Jul 11, 2024 | 11:45 AM
Share

सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसतंय. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सोनाक्षी सिन्हा दिसत आहे. सोनाक्षी सिन्हाने तिच्या इंस्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले होते. हे फोटो तिच्या लग्नातील होते. सोनाक्षी सिन्हाने हे फोटो शेअर करत लिहिले होते की, तिला तिच्या घरच्यांची खूप जास्त आठवण येत आहे. शिवाय तिने म्हटले की, आज रविवारी घरी सिंधी कढी बनली असावी. सोनाक्षी सिन्हा हिने अभिनेता झहीर इक्बाल याच्यासोबत 23 जून 2024 रोजी लग्न केले आहे. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी एकमेकांना सात वर्षे डेट केले आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नानंतर खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, या पार्टीला अनेक बॉलिवूड कलाकार देखील पोहोचले. सोनाक्षी सिन्हा लग्नाच्या पार्टीत धमाका करताना दिसली. हेच नाहीतर लग्नामध्ये सही करताना सोनाक्षी सिन्हाने तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांचा हात पकडला होता, शेजारी तिची आई देखील उभी होती.

सोनाक्षी सिन्हा हिच्या लग्नाला आता 14 दिवस पूर्ण झाली आहेत. सोनाक्षी सिन्हा हिचा पती झहीर इक्बाल याने अत्यंत खास असा फोटो शेअर केलाय. झहीर इक्बाल याने इंस्टाग्राम स्टोरीवर तो फोटो शेअर केलाय. यावेळी झहीर इक्बाल याने सोनाक्षीच्या नावाबद्दल मोठा खुलासा केलाय. अखेर झहीर इक्बालने सांगितले की, प्रेमाने तो सोनाक्षीला अखेर काय म्हणतो.

काही दिवसांपूर्वी सोनाक्षी सिन्हा हिने लग्नातील एक सुंदर फोटो शेअर केला होता. त्या फोटोवर 11.11 असे लिहिले होते. त्याचा अर्थ असा होतो की, यावेळी तुम्ही एखाद्यी गोष्ट मागितली की, ती तुम्हाला मिळते. सोनाक्षीने झहीर इक्बाल याला मागितले होते. झहीर इक्बाल याने हा फोटो रिशेअर करत लिहिले की, हा तू Angel आहेस.

फोटोमध्ये जी दिसत आहे ती माझा फरिश्ता आहे आणि मी तिच्यावर खूप जास्त प्रेम करतो. यासोबतच झहीर इक्बाल याने इमोजीही शेअर केला आहे. Angel झहीर इक्बाल हा सोनाक्षीला प्रेमाने म्हणतो. सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. सोनाक्षी सिन्हाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग देखील बघायला मिळते.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान