AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Swapnil Joshi | ‘एलिझाबेथच्या जाळ्या मधून कोणीही सुटू शकत नाही!’, पाहा स्वप्निल जोशीचा हॉरर लूक…

‘बळी’ हा चित्रपट 16 एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून या हॉरर चित्रपटात प्रेक्षकांचा लाडका अभिनेता स्वप्निल जोशी यात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Swapnil Joshi | ‘एलिझाबेथच्या जाळ्या मधून कोणीही सुटू शकत नाही!’, पाहा स्वप्निल जोशीचा हॉरर लूक...
स्वप्निल जोशी
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 12, 2021 | 9:39 AM
Share

मुंबई : ‘एलिझाबेथ कोण? हा प्रश्न चर्चेत असतानाचा आता ‘बळी’ चित्रपटाच्या नव्या पोस्टरमुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ‘बळी’ हा चित्रपट 16 एप्रिल रोजी प्रदर्शित होत असून या हॉरर चित्रपटात प्रेक्षकांचा लाडका अभिनेता स्वप्निल जोशी यात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे (Actor Swapnil Joshi upcoming marathi horror film bali new poster launch).

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरवर स्वप्निलचा अगदी घाबरवून टाकणाऱ्या अदेतील चेहरा आहे. अत्यंत रक्तरंजित अशा मनगटांनी त्याचा चेहरा घट्ट पकडला असून, स्वप्निलच्या चेहऱ्यावर रक्ताचे ओघळ दिसत आहेत. ज्याच्या मनगटांमध्ये स्वप्निलचा चेहरा जखडला आहे, त्याचा चेहरा दिसत नसला तरी तो खूप भयावह आहे, हे जाणवते. स्वप्निलच्या डोळ्यांतील अंगार, हे पोस्टर पाहणाऱ्याच्या काळजात धडकी भरवल्याशिवाय राहत नाही. त्यातच या पोस्टरवरील ‘कोण आहे एलिझाबेथ?’ हा प्रश्न आणखी अनेकानेक प्रश्न निर्माण करतो.

मराठीतील हॉररपट!

हा चित्रपट प्रेक्षकांसाठी काही धडकी भरवणारे प्रसंग पडद्यावर घेवून येतोय, याची खुणगाठ बांधण्यासाठी हे पोस्टर पुरेसे ठरते. या हॉरर मराठी चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला आहे. या चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’ने केली आहे. या कंपनीने ‘मोगरा फुलाला’, ‘बोनस’ आदी गाजलेले मराठी चित्रपट आणि ‘समांतर-१’ आणि ‘समांतर-2’ तसेच ‘नक्सलबारी’ यांसारख्या वेबसिरीजची निर्मिती केली आहे. विशाल फुरिया हे ‘लपाछपी’ या तीन वर्षांपूर्वी आलेल्या आणि गाजलेल्या थ्रिलर चित्रपटाने प्रकाशझोतात आले होते. या यशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या नवीन हॉरर चित्रपटाची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे (Actor Swapnil Joshi upcoming marathi horror film bali new poster launch).

स्वप्निलही खूप उत्सुक!

या चित्रपटाबद्दल स्वप्निलला खूप उत्सुकता आहे. तो म्हणतो, “यंदा मी नव्या प्रकारातील चित्रपट करेन, असे आश्वासन गेल्यावर्षी मी प्रेक्षकांना दिले होते. त्या दृष्टीने मी उचललेले हे एक पाऊल आहे. हॉरर चित्रपट करण्याची संधी मला मिळते आहे, हे मी माझे भाग्य समजतो. ते करत असताना कार्तिक, अर्जुन यांच्यासारखे माझे आवडते निर्माते मला मिळाले आणि त्याचवेळी माझा लाडका दिग्दर्शक विशाल हा चित्रपट दिग्दर्शित करतो आहे. मला पूर्ण खात्री आहे की, आम्ही एकत्रितपणे प्रेक्षकांना घाबरवू शकतो. आणि त्याचा प्रेक्षक चांगलाच आनंद घेतील.”

हा केवळ उड्या मारून भीती निर्माण करण्याचा प्रकार नाही!

तो पुढे म्हणतो, “जर तुम्ही थोडेसा मागे जाऊन विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की मराठी चित्रपट क्षेत्राने ‘लपाछपी’च्या आधी कधीही हॉरर चित्रपटाचा प्रयोग केलेला नाही. हॉरर विनोदी चित्रपटांचे प्रयोग झाले, पण तुमची झोप उडवेल असा मराठी चित्रपट झाला नाही. मला वाटते ‘बळी’ ती पोकळी नक्कीच भरून काढेल. त्यापेक्षाही अधिक महत्वाचे म्हणजे चित्रपटाची कथा तुम्हाला घाबरवून टाकते. नेहमी ज्याप्रमाणे भारतीय हॉरर चित्रपटांमध्ये होते तसे भडक संगीत आणि उड्या मारून भीती निर्माण करण्याचा प्रकार येथे नाही.”

(Actor Swapnil Joshi upcoming marathi horror film bali new poster launch)

हेही वाचा :

Rang Maza Vegla | ऑन स्क्रीन वैर, मात्र ऑफ स्क्रीनवर धमाल, पाहा डॉक्टर कार्तिक आणि श्वेताचा डान्स!

प्रसिद्ध मराठी अभिनेता पुन्हा एकदा विवाहबंधनात, ‘या’ खास व्यक्तीशी बांधली लग्नगाठ!

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत