Agnipath Scheme: ‘अग्निपथ हा RSSचा छुपा अजेंडा?’ नगमा यांचा आरोप

या योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार ठाम असून लष्कराच्या तिन्ही सेवांनी रविवारी अग्निवीरांच्या भरतीचा कार्यक्रम जाहीर केला. त्याचबरोबर 'अग्निपथ' विरोधातील जाळपोळ आणि तोडफोडीत सामील झालेल्या तरुणांना या योजनेची दारं बंद असतील, असा इशाराही दिला.

Agnipath Scheme: 'अग्निपथ हा RSSचा छुपा अजेंडा?' नगमा यांचा आरोप
Nagma on Agnipath Scheme
Image Credit source: Twitter
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 20, 2022 | 2:53 PM

वादग्रस्त अग्निपथ योजनेच्या (Agnipath Scheme) विरोधात सध्या देशभरात हिंसक आंदोलन सुरू आहे. या योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार ठाम असून लष्कराच्या तिन्ही सेवांनी रविवारी अग्निवीरांच्या भरतीचा कार्यक्रम जाहीर केला. त्याचबरोबर ‘अग्निपथ’ विरोधातील जाळपोळ आणि तोडफोडीत सामील झालेल्या तरुणांना या योजनेची दारं बंद असतील, असा इशाराही दिला. राजकीय क्षेत्रातूनही या योजनेविरोधात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अग्निपथ योजना ही आरएसएसचा अजेंडा आहे, असा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांनी केला. त्यावरून आता अभिनेत्री-काँग्रेस नेत्या नगमा (Nagma) यांनी ट्विट केलं आहे.

‘अग्निपथ ही योजना RSS चा अजेंडा आहे? या योजनेतंर्गत भरती होणारे 25 टक्के तरुण आरएसएसशी संबंधित असतील. खतरनाक मनसूबे आहेत. माजी पंतप्रधानांचे सुपुत्र कर्नाटकचे कुमारस्वामी याविषयी सवाल उपस्थित करत आहेत. लष्कराचं नाजीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. त्या दिशेने हे सर्व सुरु आहे’, असं नगमा यांनी ट्विट केलं आहे.

नगमा यांचं ट्विट-

काय म्हणाले कुमारस्वामी?

‘अग्निपथ योजना ही RSS चा अजेंडा आहे. या योजनेतंर्गत भरती होणारे 25 टक्के तरुण आरएसएसशी संबंधित असतील. लष्कराचं नाजीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. त्या दिशेने हे सर्व सुरु आहे,’ असा आरोप कर्नाटकातील जनता दलचे नेते कुमारस्वामी यांनी केला आहे. ते माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे पुत्र आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा भाजपचे प्रवक्ते शहजादा पूनावाला यांनी निषेध केला आणि सशस्त्र दलांचा हा थेट अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं. अग्निपथ या योजनेच्या माध्यमातून सेनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरएसएसचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप कुमारस्वामींनी केला.

अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन

अहमदाबाद शहरात अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या 14 जणांना ताब्यात घेतलं. तर हिंसक आंदोलनप्रकरणी सहारणपूर, भदोही आणि देवरिया जिल्ह्यातून अनेक जणांना ताब्यात घेण्यात आलं. याप्रकरणी उत्तरप्रदेशातून नऊ जणांना अटक करण्यात आली. पंजाबमध्ये योजनेच्या विरोधात तरुणांनी मोर्चा काढला. चंदीगड-उना राष्ट्रीय महामार्गावर तासभर रास्ता रोको करण्यात आला. पश्चिम बंगालमध्ये आंदोलनामुळे पूर्व रेल्वेने अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या तर काहींचे मार्ग बदलले. तमिळनाडूत दक्षिण रेल्वेने तीव्र आंदोलनामुळे काही गाड्या रद्द केल्या.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें