Ankita Lokhande | अंकिता लोखंडे हिचा धक्कादायक खुलासा, मोठी खळबळ, थेट म्हणाली, निर्मात्यासोबत…
अंकिता लोखंडे हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. अंकिता लोखंडे हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अंकिता लोखंडे ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन असून लग्झरी लाईफ जगते.

मुंबई : अंकिता लोखंडे हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. इतकेच नाही तर तिने काही चित्रपटांमध्येही मुख्य भूमिका केल्या. अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. अंकिता लोखंडे ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो (Photo) आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. विशेष म्हणजे अंकिता लोखंडे ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. मुंबईमध्ये एका आलिशान घरात अंकिता लोखंडे ही राहते.
अंकिता लोखंडे हिने आपल्या टीव्ही मालिकेच्या करिअरची सुरूवात 2009 मध्ये केली. विशेष म्हणजे तिची ही मालिका तब्बल 2014 पर्यंत चालली. अंकिता लोखंडे हिला खरी ओळख ही पवित्र रिश्ता या मालिकेतूनच मिळालीये. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत या मालिकेत मुख्य भूमिकेत धमाका करताना दिसले.
अंकिता लोखंडे ही बिग बाॅस 17 मध्ये सहभागी होणार हे जवळपास स्पष्टच आहे. अंकिता लोखंडे आपला पती विकी जैन याच्यासोबत धमाका करताना दिसेल. अंकिता लोखंडे ही बिग बाॅस 17 मध्ये सर्वाधिक फिस घेणारी स्पर्धेक असल्याचे देखील सांगितले जातंय. अंकिता लोखंडे हिच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह दिसतोय.
अंकिता लोखंडे हिने एका मुलाखती दरम्यान अत्यंत मोठा खुलासा केला. अंकिता लोखंडे हिने काही वर्षांपूर्वी अत्यंत धक्कादायक खुलासा केला. अंकिता लोखंडे थेट म्हणाली की, मला एका साऊथच्या चित्रपटाची आॅफर आली. त्यावेळी मी लहान होते. 18-19 वर्षांची मी स्मार्ट होते आणि कोणालाही अजिबातच घाबरत नव्हते.
मला एका रूममध्ये बोलवण्यात आले आणि थेट सांगितले गेले की, तुला चित्रपटात काम करण्यासाठी थोडी तडजोड करावी लागेल. मी त्यावेळी थेट म्हटले की, सांगा कोणत्या पार्टीत मला जावे लागेल. मात्र, त्यावेळी मला थेट सांगण्यात आले की, तुला चित्रपट निर्मात्यासोबत झोपावे लागेल. हे ऐकून मी हैराण झाले.
त्यावेळी मी त्या व्यक्तीला थेट म्हटले की, तुमच्या निर्मात्याला चांगली अभिनेत्री पाहिजे नाहीये तर झोपण्यासाठी एक मुलगी हवी आहे, असे म्हणून मी तिथून निघून गेले. यानंतर माझी माफी देखील मागण्यात आली. परत परत मला त्या चित्रपटाची आॅफर देखील आली. मात्र, मी तो चित्रपट केला नाही. अंकिता लोखंडेचे हे बोलणे ऐकून सर्वजण हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.
