Chahat Khanna: ठग सुकेश चंद्रशेखर प्रकरणासोबत नाव जोडलेल्या अभिनेत्री चाहत खन्नाने सोडले ‘मौन’

प्राजक्ता ढेकळे

Updated on: Sep 18, 2022 | 6:22 PM

मी नक्कीच बोलेन, माझा बचाव करण्यासाठी नाही, तर प्रत्यक्षात काय घडले ते सांगण्यासाठी. सध्या, मीडियाला जी माहिती पसरवली जातेय ती अर्धवट माहिती आहे. संपूर्ण कथानक काही वेगळेच आहे.

Chahat Khanna: ठग सुकेश चंद्रशेखर प्रकरणासोबत नाव जोडलेल्या अभिनेत्री चाहत खन्नाने सोडले 'मौन'

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या ठग सुकेश चंद्रशेखरसोबत (Sukesh Chandrasekhar)टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री चाहत खन्नाचे (Chahat Khanna)नाव चर्चेत आहे. चाहत सुकेशला भेटायला तिहार तुरुंगात गेली होती, असा दावा केला जात होता. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि नोरा फतेही 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money laundering cases))सहभागी झाल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आहे . नुकतीच या प्रकरणात निक्की तांबोळी आणि चाहत खन्ना यांची नावे समोर आली होती, त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यावर आता चाहत खन्ना यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तिहार तुरुंगात सुकेश चंद्रशेखर यांची भेट घेतल्याचे वृत्त आल्यानंतर चाहत खन्ना आणि निक्की तांबोळी यांनाही गुरुवारीच चौकशीच्या कक्षेत आणण्यात आले. यावर चाहत खन्नाने यावर ती योग्य वेळ असेल तेव्हा ती आपली बाजू मांडेल असे म्हटले आहे.

चाहत खन्ना म्हणाले की, मी माझ्या सहभागाबद्दलचे सर्व अहवाल पाहिले आहेत. खरं तर, मला खूप काही सांगायचं आहे, पण मग मला वाटतं की मी स्वतःला का स्पष्टीकरण द्यावे. आता काही अर्थ नाही. ही वेळ नाही जेव्हा मी स्वतःला स्पष्टीकरणं दिल पाहिजे किंवा मला स्वतःला स्पष्ट करण्याची गरज आहे. योग्य वेळ आल्यावरच ती बोलणार असल्याचे तिने म्हटलं आहे.

चाहत  पुढे म्हणाले, “मी नक्कीच बोलेन, माझा बचाव करण्यासाठी नाही, तर प्रत्यक्षात काय घडले ते सांगण्यासाठी. सध्या, मीडियाला जी माहिती पसरवली जातेय ती अर्धवट माहिती आहे. संपूर्ण कथानक काही वेगळेच आहे. मीडियारिपोर्टनुसार निक्की तांबोळी, चाहत खन्ना, सोफिया सिंग आणि आरुषा पाटील हे त्यांची सहकारी पिंकी इराणी यांच्यामार्फत सुकेश चंद्रशेखरला भेटण्यासाठी दिल्लीतील तिहार तुरुंगात गेले होते.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI