Hacked | ईशा देओलचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक, चाहत्यांना दिला ‘हा’ संदेश!

बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलसुद्धा (Esha Deol) सायबर फसवणुकीची बळी ठरली आहे.

Hacked | ईशा देओलचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक, चाहत्यांना दिला 'हा' संदेश!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलसुद्धा (Esha Deol) सायबर फसवणुकीची बळी ठरली आहे. गेल्या महिन्यापासून अनेक सेलिब्रिटींची सोशल मिडियाची अकाउंट हॅक होत आहेत. रविवारी सकाळी इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याबद्दल ईशाने ट्विट केले. ईशाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आज सकाळी माझे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे, माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तुम्हाला काही मेसेज आले त्याला उत्तर देऊ नका. (Actress Esha Deol’s Instagram account hacked)

अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) इन्स्टाग्रामवर सायबर फसवणूक होत असल्याचा एक संदेश लोकांना दिला होता. ज्यामध्ये रितेशने माहिती दिली होती की, कशाप्रकारे तुम्हाला त्यामध्ये अडकवले जाते. या बाबत रितेशने एक ट्विट केले होते आणि काही स्क्रीनशॉट शेअर केले. तर दुसऱ्या ट्विटमध्ये महाराष्ट्र सायबर सेल विभागाकडून याबाबत माहिती सांगण्यात येत असल्याचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये इन्स्टाग्रामवर एक संदेश येतो तुम्ही शेअर केलेली पोस्ट कॉपीराइट उल्लंघन दाखवते आहे, हे चुकीचे आहे.

बद्दल आपला अभिप्राय द्या, अन्यथा तुमचे खाते 24 तासांच्या आत बंद होईल. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन आपण आपला अभिप्राय देऊ शकता. असा संदेश पाठवला जात आहे आणि जर ही लिंक आपण क्लिक केली तर आपली सर्व माहिती चोरली जाते आणि आपले अकाऊंट हॅक केले जाते. या सर्व प्रकाराचा अनुभव रितेश देशमुखला आला आहे. आणि तो सर्वांना अशा प्रकारच्या संदेश आणि लिंकपासून सतर्क राहिले पाहिजे असे सांगत आहे.

अलीकडेच बॉलिवूडमधील सेलिब्रिटी सायबर फसवणूकीचे शिकार होत आहेत. ज्यामध्ये त्यांचे इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक अकाउंट्सना हॅक केले जात आहे. चित्रपट निर्माते आनंद एल. राय, अभिनेता विक्रांत मैसी आणि उर्मिला मातोंडकर, कोरियोग्राफर फराह खान आणि गायक आशा भोंसले,अंकित तिवारी याचे सोशल मिडियाचे अकाऊंट हॅक झाले आहेत.

संबंधित बातम्या : 

Fighter | अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली, हृतिकने ‘या’ चित्रपटाची केली घोषणा!

Self Obsessed | कंगना रनौतने स्वतःची तुलना केली अमिताभ बच्चन यांच्याशी, म्हणते तापसी माझी मोठी फॅन!

(Actress Esha Deol’s Instagram account hacked)

Published On - 5:37 pm, Sun, 10 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI