AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | गौहर खानने शेअर केला बेडरूम व्हिडीओ, पती जैद दरबारचा क्युट अंदाज पाहून चाहते म्हणतात…

‘बिग बॉस फेम’ अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) हिचा एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ गौहर आणि जैद दरबार (Zaid Darbar) यांच्या बेडरूममधला आहे.

Video | गौहर खानने शेअर केला बेडरूम व्हिडीओ, पती जैद दरबारचा क्युट अंदाज पाहून चाहते म्हणतात...
गौहर खान
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: May 18, 2021 | 5:09 PM
Share

मुंबई : ‘बिग बॉस फेम’ अभिनेत्री गौहर खान (Gauahar Khan) हिचा एक नवीन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ गौहर आणि जैद दरबार (Zaid Darbar) यांच्या बेडरूममधला आहे, ज्यात दोघेही अगदी कॅज्युअल स्टाईलमध्ये दिसत आहेत. जैदने बनियन व शॉर्ट्स परिधान केल्या आहेत, तर गौहरदेखील कॅज्युअलमध्ये लूकमध्ये दिसली आहे. परंतु, त्यांचा हा रोमँटिक व्हिडीओ जसजसा पुढे जातो, तसतसे चाहत्यांना आपले हसणे थांबवणे कठीण होते (Actress Gauahar Khan share Husband Zaid Darbar cute Bedroom Video).

या क्युट व्हिडीओमध्ये जैद दरबार पत्नी गौहर खान हिच्या डोक्याजवळ पाय ठेवताना दिसला आहे. स्वत: गौहरसुद्धा या व्हिडीओमध्ये आपले हसू थांबवू शकली नाही. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये गौहर खानने लिहिले की, ‘एक प्रेम असही…’ व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर ओम शांती ओम चित्रपटातील गाणे वाजत आहे आणि या रोमँटिक ट्रॅकसह या दोघांची केमिस्ट्री देखील खूपच सुंदर दिसते आहे.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया…

काही तासांतच लोकांनी लाखोंच्या संख्येने हा क्युट व्हिडीओ लाईक आणि शेअर केला आहे. एका वापरकर्त्याने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, ‘कोणालाही मान्य असेल की नाही, हे मला माहित नाही, पण तुम्ही हसता तेव्हा तुम्ही खूप आकर्षक दिसता.’ दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, ‘आधी मला वाटले की, हा त्याचा हात आहे.’ त्याचप्रमाणे एका माणसाने लिहिले की, ‘अरे देवा, हे त्याचे पाय आहेत.’(Actress Gauahar Khan share Husband Zaid Darbar cute Bedroom Video)

व्हिडीओ पाहताना चाहतेही बुचकळ्यात

गौहर खानचा हा व्हिडीओ इतक्या स्मार्ट पद्धतीने शूट केला आहे की, बर्‍याच वापरकर्त्यांना सुरुवातीला असे वाटले की, जैदने गौहरवर हात ठेवले आहेत. पण ही क्लिप जसजशी पुढे सरकत जाईल, तसतसे सर्व आणखी आश्चर्यचकित होत जातात. गौहर खान ही ‘बिग बॉस सीझन 14’चा देखील एक महत्त्वपूर्ण भाग होती. तिला ‘तूफानी सिनिअर’ म्हणून बिग बॉसच्या घरात आणले गेले होते. परंतु, काही आठवड्यांनंतर ती या घराबाहेर पडली होती.

दोघांच्या वयात तफावत…

काहीच महिन्यांपुर्वी ही जोडी विवाह बंधनात अडकली. जेव्हा जैद आणि गौहरच्या नात्याची बातमी समोर आली, तेव्हा गौहर जैदपेक्षा 12 वर्षांनी मोठी असल्याचा चर्चांना उधाण आले होते. पण, खुद्द गौहर हिने यावर प्रतिक्रिया देत ही गोष्ट चुकीचे असल्याचे म्हटले आहे. गौहरने आपण जैदपेक्षा काही वर्षांनी मोठी असल्याची बाब कबुल केली. मात्र, जैदला या गोष्टीमुळे काहीच फरक पडत नसल्याचे देखील तिने म्हटले होते.

(Actress Gauahar Khan share Husband Zaid Darbar cute Bedroom Video)

हेही वाचा :

Photo: साक्षी मलिकचा हॉट अवतार, सोशल मीडियात ‘खलीवली’

Religion Change : प्यार दिवाना होता हैं…, ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींनी केलं धर्म परिवर्तन

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली