AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gauahar Khan | ‘कुबुल है’ म्हणत अभिनेत्री गौहर खान बनली प्रसिद्ध संगीतकाराची सून!

मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान (Gauhar Khan) नुकतीच जैद दरबारसह (Zaid Darbar) लग्न बंधनात अडकली.

Gauahar Khan | ‘कुबुल है’ म्हणत अभिनेत्री गौहर खान बनली प्रसिद्ध संगीतकाराची सून!
| Updated on: Dec 25, 2020 | 6:05 PM
Share

मुंबई : मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान (GauaharKhan) नुकतीच जैद दरबारसह (Zaid Darbar) लग्न बंधनात अडकली. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी आपल्या निकाहची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दोघांच्याही पोस्टवर सध्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. एका छोटेखानी समारंभात त्यांचा निकाह पार पडला आहे. या निकाहाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत (Gauahar Khan And Zaid Darbar Ties Knot in private ceremony).

या निकाहावेळी गौहर खानने पेस्टल रंगाचा वेडिंग आऊटफिट परिधान केला होता. या वेडिंग लूकसोबत तिने भरजरी दागिने घातले होते. जैदनेही क्रीम कलरची शेरवानी परिधान केला होता. दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत होते.

View this post on Instagram

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

मेंदी सोहळ्याचे फोटो चर्चेत

निकाहापुर्वी गौहर खानचा मेंदी सोहळा आयोजित करण्यात आला होता. गौहरने मेहंदी फंक्शनमध्ये ग्रीन कलरचा शारारा परिधान केला होता. त्याच वेळी जैदने ग्रीन कलरचा कुर्ता आणि जॅकेटसह पांढरा पायजामा घातला होता. दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत होते. त्यांचा या सोहळ्यांचे फोटो सोशल मीडियावर सध्या खूप चर्चेत आहेत.

View this post on Instagram

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan)

(Gauahar Khan And Zaid Darbar Ties Knot in private ceremony)

संगीतकार इस्माईल दरबार यांचे खास गाणे…

गौहर आणि जैदच्या निकाह सोहळ्यात दोघांच्या कुटुंबियांनी धमाल केली. यावेळी जैद दरबारचे वडील, संगीतकार इस्माईल दरबार यांनी खास ‘तडप-तडप के इस दिल..’ हे गाणे गायले. जैद आणि गौहरने या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला (Gauahar Khan And Zaid Darbar Ties Knot in private ceremony).

जैद माझ्यासारखाच आहे : गौहर खान

जैद अगदी माझ्यासारखाच आहे. आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि त्यानंतर काही दिवसांनीच एकमेकांसोबत वेळ घालवण्यास सुरुवात केली. लग्न करायचे असे काही ठरवले नव्हते. पण आमच्या पहिल्या भेटीच्या अवघ्या एक महिन्यानंतर जैदने मला लग्नासाठी विचारले’, अशी प्रतिक्रिया गौहर खानने दिली.

दोघांच्या वयात तफावत…

जेव्हा जैद आणि गौहरच्या नात्याची बातमी समोर आली, तेव्हा गौहर जैदपेक्षा 12 वर्षांनी मोठी असल्याचा चर्चांना उधाण आले होते. पण, खुद्द गौहर हिने यावर प्रतिक्रिया देत ही गोष्ट चुकीचे असल्याचे म्हटले आहे. गौहरने आपण जैदपेक्षा काही वर्षांनी मोठी असल्याची बाब काबुल केली. मात्र, जैदला या गोष्टीमुळे काहीच फरक पडत नसल्याचे देखील तिने म्हटले.

(Gauahar Khan And Zaid Darbar Ties Knot in private ceremony)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...