जातीमुळे तोडले बॉयफ्रेंडसोबत नाते, अभिनेत्रीने ब्रेकअपनंतर केले आठ महिन्यातच लग्न, हैराण करणारा ‘तो’ व्हिडीओ…

अभिनेत्री हिमांशी खुराना हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हिमांशी खुरानाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे हिमांशी खुराना ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

जातीमुळे तोडले बॉयफ्रेंडसोबत नाते, अभिनेत्रीने ब्रेकअपनंतर केले आठ महिन्यातच लग्न, हैराण करणारा तो व्हिडीओ...
Himanshi Khurana
| Updated on: Aug 06, 2024 | 11:47 AM

अभिनेत्री हिमांशी खुराना हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे हिमांशी खुराना हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हिमांशी खुराना ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही हिमांशी खुराना दिसते. हिमांशी खुराना ही बिग बॉस 13 मध्ये पोहोचली होती. मात्र, म्हणावा तसा धमाकेदार गेम खेळण्यात अजिबातच तिला यश मिळाले नाही. हिमांशी खुराना हिच्या गेमपेक्षा चर्चा रंगली ती म्हणजे आसिम आणि तिच्या प्रेमाची. आसिम आणि हिमांशी खुराना यांची लव्ह स्टोरी ही बिग बॉसच्या घरातूनच सुरू झाली.

अनेक वर्षे एकमेकांना डेट करताना हिमांशी खुराना आणि आसिम हे दिसले. मध्यंतरी चर्चा होती की, लवकरच हिमांशी खुराना आणि आसिम लग्न करणार आहेत. बिग बॉसच्या घरात ज्यावेळी हिमांशी खुराना ही दाखल झाली होती, त्यावेळी तिचा अगोदरच साखरपुडा झाला होता. मात्र, आसिम आणि तिची जवळीकता पाहून तिचे ते रिलेशन तुटले.

गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा रंगताना दिसत आहे की, धर्मामुळे हिमांशी खुराना हिने आसिम याच्यासोबत ब्रेकअप केले आहे. आता दोघांचे मार्गही वेगळे झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच एका मुलीसोबतच अत्यंत रोमांटिक फोटो आसिम याने सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, त्या फोटोंमध्ये त्या मुलीचा चेहरा दिसू शकला नव्हता.

आता हिमांशी खुराना ही देखील आपल्या आयुष्यात पुढे गेल्याचे काही फोटो आणि व्हिडीओवरून स्पष्ट दिसत आहे. हिमांशी खुराना हिचा एक व्हिडीओ आणि काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये ती नदीच्या किनारी उभी राहिल्याचे बघायला मिळतंय. विशेष म्हणजे यावेळी ती नवरीच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

पंजाबी लग्नातील नवरीची ड्रेसिंग तिने केल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता यामुळेच विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. अनेकांचे म्हणणे आहे की, हिमांशी खुराना हिने सर्वांच्या गुपचूप लग्न केले आहे आणि त्याचेच हे फोटो आहेत. काही जणांचे म्हणणे आहे की, हे फोटो आणि व्हिडीओ तिच्या नवीन प्रोजेक्टचे असावेत. मात्र, खरोखरच हिमांशी खुराना हिने लग्न केले का? याबद्दल काही खुलासा हा होऊ शकला नाहीये.