AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुस्लिम अभिनेत्रीने महाराष्ट्राच्या राज्यपालांना भेटून गणेशोत्सवासंदर्भात केली मोठी मागणी

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री हिना खानने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने राज्यपालांकडे एक मागणी केली आहे. या मागणीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.

मुस्लिम अभिनेत्रीने महाराष्ट्राच्या राज्यपालांना भेटून गणेशोत्सवासंदर्भात केली मोठी मागणी
Hina KhanImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 14, 2026 | 10:22 AM
Share

आज संपूर्ण राज्यात गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. घरोघरी बाप्पाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सुंदर देखावे, फुलांची आरास, रोशनाई करण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी गणेश चतुर्थीच्या आधी, एका मुस्लिम अभिनेत्रीने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भेट घेतली. तसेच तिने एक खास मागणी केली. या मागणीने सर्वांची मने जिंकली आहे.

अभिनेत्री हिना खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हिना खानने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची भेट घेतली. त्यांनी भेटीचे फोटो शेअर केले आणि सर्वांना पर्यावरणपूरक गणपती मूर्ती वापरण्याचे आवाहन केले.

हिनाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, “मला या उपक्रमाचा भाग बनवल्याबद्दल धन्यवाद, माननीय महाराष्ट्र राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा जी. या गणेश चतुर्थीला निसर्गाला हानी न पोहोचवता बाप्पाला घरी आणूया. आमच्या माननीय राज्यपालांच्या नेतृत्व आणि दृष्टिकोनातून प्रेरणा घेऊन, मी सर्व भारतीयांना पुन्हा एकदा या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करते.”

हिना खानने केले आवाहन

अभिनेत्रीने पुढे लिहिले की, “पर्यावरणपूरक मूर्ती ही फक्त एक ट्रेंड नाही; ती योग्य पद्धत आहे. पीओपी नसल्याने प्रदूषण कमी होते, आपल्या जलस्रोतांचे नुकसान कमी होते आणि आपल्याला मिळालेल्या संसाधनांबद्दल थोडी अधिक काळजी घेतली जाते. कारण शाश्वतता ही आधुनिक कल्पना नाही. हा सभ्यतेचा मार्ग आहे, भारतीय मार्ग आहे.”

हिना यांनी असेही लिहिले की निसर्गाचा आदर करावा आणि जे आपल्याला जीवन देते त्याचे रक्षण करावे. त्यांनी सर्वांना सण साजरा करताना हानी पोहोचवू नये असे सांगितले आणि सर्वांना खूप आनंदी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.

चाहत्यांनी हिना खान यांची प्रशंसा केली

हिनाच्या या कृतीने त्यांच्या चाहत्यांना प्रभावित केले आहे. एका चाहत्याने त्यांच्या पोस्टवर कमेंट केली, “ती खरी धर्मनिरपेक्ष नागरिक आहे.” दुसऱ्या इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले, “आपल्याला बाप्पा भेटले कारण तुम्ही सर्व धर्मांचा आदर करता.” आणखी एका नेटिझनने कमेंट केली, “तुम्ही याचा भाग होण्यास पात्र आहात हिना खान, सुंदर शेरनी हिना खानला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आणि महाराष्ट्राचे राज्यपाल श्री. जिष्णु देव वर्मा जी.”

Follow Us
चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार...
Manoj Jarange Patil : चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार... मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा
महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर; आधी सत्तेतून बाहेर पडा...
Mahayuti : महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर; आधी सत्तेतून बाहेर पडा, मग... महेंद्र थोरवेंचं तटकरेंना थेट आव्हान
ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज....
Shivsena : ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी...
Shivsena : महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी; योगेश कदमांनी दिले संकेत
दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना
Radhakrishna Vikhe-Patil : दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाड्यातील चार जिल्ह्यांना मिळणार पाणी; विखे पाटलांनी सांगितलं संपूर्ण नियोजन
नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुली
Nanded : दादागिरी नाही चालणार! नांदेडमध्ये फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; सक्तीच्या वसुलीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक
सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
Sunetra Pawar Meeting : NCP : सुनेत्रा पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?