
टीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन ही नेहमीच तिच्या बिनधास्त स्वभावामुळे चर्चेत असते. जस्मिन भसीनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे जस्मिन भसीन ही बिग बॉसमध्येही सहभागी झाली. व्लॉगच्या माध्यमातून जस्मिन भसीन ही चाहत्यांच्या संपर्कात असते. जस्मिन भसीन हिच्या डोळ्यांना काही दिवसांपूर्वीच गंभीर इजा झाली होती. यावेळी तिला काहीच दिसत नव्हते. जस्मिन भसीन ही अली गोनी याला डेट करत आहे. विशेष म्हणजे दोघांनीही आपले प्रेम बिग बॉसच्या घरात व्यक्त केले होते. जस्मिन भसीन हिला सपोर्ट करण्यासाठी अली गोनी हा बिग बॉसच्या घरात पोहोचला होता.
लाफ्टर शेफ शोमध्ये अली गोनी हा पोहोचला आहे. विशेष म्हणजे हा शो धमाका करताना दिसतोय. या शोमध्ये काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री श्रद्धा कपूर ही पोहोचली होती. विशेष म्हणजे अली गोनी याचे क्रश श्रद्धा कपूर ही आहे. श्रद्धा कपूर हिला पाहाताच अली गोनी याला काहीच कळत नव्हते. अली गोनी म्हणाला की, क्रश हे कायमच क्रश असते.
हेच नाही तर अली गोनी हा श्रद्धा कपूर हिला वरमाळा घालताना देखील दिसला. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसले. अनेकांनी थेट म्हटले की, अली गोनी याने जस्मिन भसीन हिला धोका दिलाय. आयुष्यभर एकसोबत राहण्याचे वचन देखील अली गोनी याने जस्मिन भसीला देऊनही थेट श्रद्धा कपूर हिला वरमाळा घातली.
जस्मिन भसीन आणि अली गोनी यांचे ब्रेकअप झाल्याची देखील जोरदार चर्चा आहे. नुकताच आता जस्मिन भसीन ही स्पॉट झालीये. यावेळी जस्मिन भसीन हिला विचारण्यात आले की, तुझे आणि अलीचे ब्रेकअप झाले आहे का? यावर जस्मिन भसीन थेट म्हणाली की, बकवास सुरू आहे. चार वर्षांच्या रिलेशननंतर यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.
जस्मिन भसीन हिला डेट करण्याच्या अगोदर अली गोनी हा हार्दिक पांड्या याची एक्स पत्नी नताशा हिला डेट करत होता. दोघे काही शोमध्येही सहभागी झाले होते. मात्र, त्यानंतर नताशा आणि अली गोनी यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर अली गोनी याने जस्मिन भसीन हिला डेट करण्यास सुरूवात केली. अली गोनी याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.