AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kajal Raghwani : तो मला जमिनीवर ढकलायचा आणि…लोकप्रिय अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंडबद्दल खुलासा, केलेला शारीरिक छळाचा सामना

Kajal Raghwani : अभिनेत्री काजल राघवानीनं एका शोमध्ये तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल खुलासा केला आहे. अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंड तिचा शारीरिक छळ करायचा, असं तिनं सांगितलंय.

Kajal Raghwani : तो मला जमिनीवर ढकलायचा आणि...लोकप्रिय अभिनेत्रीचा एक्स बॉयफ्रेंडबद्दल खुलासा, केलेला शारीरिक छळाचा सामना
| Updated on: Oct 02, 2026 | 8:14 PM
Share

भोजपुरी अभिनेत्री काजल राघवानीनं एका नवीन रिॲलिटी शोमध्ये प्रवेश केला आहे. अलीकडेच, ती भोजपुरी इंडस्ट्रीचा पहिल्या रिॲलिटी शो ‘भोजपुरी बवाल’मध्ये दिसली होती. यामध्ये आम्रपाली दुबेसोबत झालेला तिचा वाद चर्चेचा विषय ठरला होता. आता, तिनं ‘राईज अँड फॉल २’ मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश केला आहे. यामध्ये अभिनेत्रीनं तिच्या आयुष्यातील कठीण काळ सांगितला आहे. आपली वेदनादायक कहाणी सांगताना, काजलनं तिच्या ब्रेकअपबद्दल सांगितलं. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये, काजलनं तिच्या हिंसक रिलेशनशिपबद्दल सांगितलं आणि खुलासा केला की, तिला वारंवार शारीरिक मारहाणीला सामोरं जावं लागत होतं. तिचा एक्स बॉयफ्रेंड तिचे केस ओढायचा.

अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग

काजल राघवानीने नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये तिच्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल सांगितलं. काजल म्हणाली की, ‘मला खूप मारहाण झाली आहे. ज्या माणसावर मी प्रेम केलं, त्यानं मला खूप मारलं. मी अजून कोणालाही त्याचं नाव सांगितलं नाही, आणि भविष्यातही सांगणार नाही. लोकांनी माझ्याबद्दल मतं बनवली आहेत, माझ्याबद्दल मतं तयार केली आहेत, पण मला त्यांना काहीही सांगण्याची गरज नाही. तो मला मारायचा, जमिनीवर ढकलायचा आणि लाथा मारायचा.’

काजल राघवानी पुढे म्हणाली, ‘आता माझे केसही कमी झाले आहेत. तुम्हाला माहित आहे का का? तो माझे केस पिळायचा आणि ओढायचा. एके दिवशी, तो सगळा प्रकार संपल्यावर, मी माझ्या केसांना स्पर्श केला आणि ते सर्व माझ्या हातात होते.’

काजल राघवानीने तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल उघडपणे बोलण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, तिनं भोजपुरी बवालमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलं होतं आणि तिच्या क्लेशकारक बालपणीच्या आठवणी सांगितल्या होत्या. अभिनेत्री म्हणालेली की, ‘माझे वडील माझ्या आईला खूप मारहाण करायचे. मला वाटतं की जर मी तेव्हा यशस्वी झाले असते, तर कदाचित मी माझ्या आईला या सगळ्यातून वाचवू शकले असते. एकदा, जेव्हा माझी आई त्यांचे पाय चोळत होती, तेव्हा त्यांनी तिला इतक्या जोरात लाथ मारली की, ती भिंतीवर आदळली.’

‘मला भोजपुरीमध्ये करिअर सुरू करण्यास भाग पाडलं गेलं. कारण, माझ्या वडिलांना वाटत होतं की, मी टीव्हीमध्ये काम करावं. माझी कोणतीही चूक नसताना मला मारहाण आणि शारीरिक अत्याचार सहन करावे लागले.’ असंही अभिनेत्री म्हणाली.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू