अश्लील फोटो आणि व्हिडीओ विकून दोन महिन्यात कमावले 10 कोटी, कोण आहे ही अभिनेत्री?
एका अभिनेत्रीने स्वत:ची अशी एक वेब साईट सुरु केली होती. या साईटवर अश्लील फोटो आणि व्हिडीओ विकून तिने 10 कोटी रुपये कमावले होते.

सोशल मीडियावर सेन्सेशन बनून अभिनय किंवा वेबसीरिजमध्ये नाव व काम दोन्ही खूप वेगाने मिळत आहे. सध्या खुशी मुखर्जी तिच्या लूक आणि कपड्यांमुळे सातत्याने चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून छोटे कपडे घालण्याच्या वादामुळे ती चर्चेत होती. याच दरम्यान, एका मुलाखतीत तिने दावा केला की तिने तिचे फोटो आणि व्हिडीओ विकून 10 कोटी रुपये कमावले होते. तेही केवळ दोन महिन्यांमध्ये.
Galatta शी बोलताना जेव्हा तिला प्रश्न विचारण्यात आला की, सप्टेंबर 2022 मध्ये तू तुझे फोटो-व्हिडीओ विकून एका वेबसाइटच्या माध्यमातून दहा कोटी रुपये कमावले, हे खरं आहे की खोटं? त्यावर अभिनेत्रीने उत्तर दिलं, “खरं आहे. मी माझं एक अॅप तयार केलं होतं, खुशी मुखर्जीच्या नावाने, ते अजूनही आहे. मी कंटेंट बदललं आहे. अजूनही आहे. पण त्या वेळी अशा कमेंट्स नव्हत्या की मी काही आक्षेपार्ह केलं होतं. वेब सीरिजपासून वेगळं असं काही नव्हतं. अनेक चाहते होते ज्यांना माझ्याशी बोलायचं होतं, कनेक्ट व्हायचं होतं. त्या वेळी हे खूप वेगळं होतं. आजकाल अनेक मोठ्या अभिनेत्री असं करू लागल्या आहेत.”
वाचा: मॉडेलच्या छातीवरील त्या खुणा पाहून संतापला बॉयफ्रेंड, शीतल हत्या प्रकरणी मोठी अपडेट
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली, “आजकाल हे खूप सामान्य झालं आहे. फोटो-व्हिडीओ अशा अनेक गोष्टी होत्या ज्या अनेक चाहत्यांनी अनलॉक केल्या होत्या. एका चाहत्याने फक्त चार-पाच वेळेच्या भेटीत एक कोटी 13 लाख रुपये खर्च केले होते. तो भारताबाहेरचा होता.”
कसे फोटो-व्हिडीओ होते?
यावर उत्तर देताना खुशी म्हणाली, “सामान्य हाय हॅलो होतं. जे आजकाल लोक पाहत आहेत तेच फोटो-व्हिडीओ, जे लोकांनी वेब सीरिजमध्ये पाहिले. मी इंस्टाग्रामवरही अपलोड केले होते.”
छोटे कपडे घातल्याने झाली होती ट्रोल
नुकतंच खुशी मुखर्जी मुंबईत फोटोग्राफर्ससमोर छोटे कपडे घातल्याने ट्रोल झाली होती. इंटरनेटवर अनेक युजर्सनी तिच्या कपड्यांच्या सेन्सवर कमेंट केली होती. यावर बराच वादही झाला होता. यावर एका व्हिडीओमध्ये जरीन खानसारख्या अभिनेत्रीनेही कमेंट केली होती की, हे कपडे घालण्याचा उद्देश काय होता. जरीनच्या व्हिडीओमध्ये किती सत्यता होती हे माहिती नाही, पण त्या व्हिडीओवर खुशीने कमेंट करत अभिनेत्रीला सुनावलं होतं.
खुशी म्हणाली होती की, जरीन खान माझ्यावर कमेंट करताना व्हिडीओमध्ये जेवढा एक्सप्रेशन देत आहे, तेवढे जर तिने अभिनयाच्या वेळी थोडासे तरी दिले असते तर आज तिच्या नावावर अनेक चित्रपट असते.
दुसऱ्या एका मुलाखतीत जेव्हा तिला एका युजरच्या कमेंटबद्दल विचारण्यात आलं- या कपड्यांमध्ये तर सर्व काही उघडं-उघडं दिसत आहे, तेव्हा खुशी म्हणाली, “काय उघडं-उघडं दिसत आहे. माझे प्रायव्हेट पार्ट्स दिसले का? किती शॉर्ट प्रत्यक्षात शॉर्ट आहे?”
