
आजकाल सोशल मीडियामुळे अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. कधी कधी जे व्हिडीओ व्हायरल करायचे नसतात ते देखील व्हायरल होताता. या व्हायरल झालेल्या व्हिडीओंमुळे अडचणींचा देखील सामना करावा लागतो. असेच काहीसे एका अभिनेत्रीसोबत घडले. या अभिनेत्रीने मध्यरात्री सूनसान रस्त्यावर गाडी थांबवली. आणि नंतर जे काही केलं त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. आता त्यावर पोलिसांनी अॅक्शन घेतली आहे.
आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहेत ती अभिनेत्री, गायिका आणि कंटेन्ट क्रिएटर मेघा कौर आहे. ती सध्या तिच्या म्युझिक व्हिडीओ किंवा चित्रपटामुळे नव्हे, तर एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे .हा व्हिडीओ मुंबईच्या लोखंडवाला बॅक रोड येथील असल्याचा म्हटले जात आहे. या रोडवर मेघाने एक स्टंट केला केला आहे. या धोकादायक स्टंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मुंबई पोलिसांनी याविरोधात कारवाई केली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
मेघा कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने धोकादायक कार स्टंटचा एक व्हिडीओ शेअर केला, ज्यानंतर ती चर्चेत आली. व्हिडीओमध्ये मेघा चलत्या कारमधून जीवघेणा स्टंट करताना दिसत आहे. तिने हा स्टंट मध्यरात्री लोखंडवाला येथील सूनसा परिसरात केला आहे. या व्हिडीओवर ऑनलाइन युजर्सनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे प्रकरण माध्यमांपर्यंत आणि सोशल प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचताच मुंबई पोलिसही सक्रिय झाले आणि त्यांनी व्हिडीओची चौकशी सुरू केली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्याच्या शक्यतेने आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘माझी विनंती आहे की हे अजिबात ट्राय करू नका.’
मेघाला द्यावे लागले स्पष्टीकरण
दरम्यान, या प्रकरणी आता मेघानेही स्पष्टीकरण दिले आहे. तिने आपल्या इंस्टा स्टोरीवर हा व्हिडीओ बनवण्यामागचे कारण सांगत आपली बाजू मांडली आहे. तसेच एका व्यक्तीवर नाराजीही व्यक्त केली आहे. ती म्हणाली, “हॅलो, मी एक अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर आहे. हा व्हिडीओ मी फक्त कंटेंटसाठी शूट केला होता आणि अशा ठिकाणी केला होता जिथे लोकं नव्हते. माझा हेतू वाहतूक नियम तोडण्याचा किंवा कोणाला चुकीचा संदेश देण्याचा अजिबात नव्हता.”