Shefali Jariwala : पुढल्या जन्मात झुरळ किंवा उंदीर.. मृत्यूच्या 10 महिने आधी शेफाली दुसऱ्या जन्माबद्दल काय बोलली ?

शेफाली जरीवाला ही अशा अभिनेत्रींपैकी एक होती जी आयुष्य पूर्णपणे जगण्यावर विश्वास ठेवत होती. तिने वयाच्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. याच दरम्यान आता तिचा एक पॉडकास्ट चर्चेत आहे, जो तिने बिग बॉसचा माजी स्पर्धक पारस छाब्रा सोबत केला होता. त्यात ती दुसऱ्या जन्माबद्दल बरंच बोलली होती.

Shefali Jariwala : पुढल्या जन्मात झुरळ किंवा उंदीर.. मृत्यूच्या 10 महिने आधी शेफाली दुसऱ्या जन्माबद्दल काय बोलली ?
मृत्यूच्या 10 महिने आधी शेफाली दुसऱ्या जन्माबद्दल काय बोलली ?
Image Credit source: social media
| Updated on: Jun 30, 2025 | 11:38 AM

मॉडेल आणि अभिनेत्री शेफाली जरीवाला हिच्या अकस्मात निधनामुळे सगळेच हादरले आहेत. 27 जूनला कार्डिॲक अरेस्टमुळे तिचा मृच्यू झाला. शोकाकुल वातावरणात तिच्यावर ओशिवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र आता तिच्या मृत्यूनंतर अनेक प्रकारच्या गोष्टी बोलल्या जात आहेत. ती अँटी एजिंग औषधं घेत होती असं म्हटलं जात आहे. तर काही रिपोर्ट्समध्ये असाही दाव करण्यात आला होता की तरुण दिसण्यासाठी शेफालीने अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया देखील केल्या होत्या. मात्र, एका मुलाखतीत शेफाली जरीवालाने स्वत:च सांगितलं होतं की ती त्वचेच्या डॉक्टरांकडे जायची. पण तिने तिथे काय केलं, हे सांगण्यास तिने नकार दिला. यावेळी ती पुढल्या जन्माबद्दलही बोलली होती.

बिग बॉस सीझन 13 मध्ये असलेला माजी स्पर्धक, पारस छाब्रा याच्या पॉडकास्टमध्ये आलेल्या शेफालीने अनके मुद्यांवर भरभरून भाष्य केलं होतं. तेव्हा शेफाली म्हणाली होती की, जे सुंदर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा अवलंब करतात ते चुकीचे नाहीत. प्रत्येकाला सुंदर दिसायचं असतं, त्यात काही चुकीचं नाही, असंही तिने नमूद केलं. पॉडकास्ट दरम्यान, पारसने तिला एक प्रश्न विचारलाहोता, “तुम्ही एस्थेटिशियन (सौंदर्यतज्ज्ञांकडे) जाता का? जो बोटॉक्स, फिलर्स, फेस सर्जरी करतात, त्याच्याकडे?” त्यावर शेफाली म्हणाली, “प्लास्टिक सर्जन वेगळे असतात आणि स्किन डॉक्टर वेगळे असतात.” पुढे पारसने विचारलं की, “तुम्ही काय केलं आहे?” त्यावर शेफालीने काही सांगण्यास नकार दिला, ती म्हणाली की ” ते सांगण्यासारखं असतं का ?”

खूप वेदना होतात

पुढे शेफाली म्हणाली की, प्रत्येकाला चांगलं दिसायचं असतं. जर तुम्ही बुटके असाल तर तुम्हाला उंच दिसावसं वाटतं. त्यात काय चूक आहे? हे तर कोल्ह्यासा द्राक्ष आंबट वाटतात, तसं प्रकरण आहे. ती म्हणाली, “ज्यांना ते (सर्जरी वगैरे) पूर्ण करता येत नाही, ज्यांच्याकडे मार्ग नाही,ज्यांना समाजाची खूप भीती वाटते. त्यांना वाटते की हे चुकीचे आहे. पण हे चुकीचं नाही. तुम्ही प्रो असाल (त्याबद्दल सर्व काही जाणून घेणारे असाल). हे खूप महाग आहे. आणि ते खूप त्रासदायक आहे.” असं तिने नमूद केलं होतं.

पुढल्या जन्माबद्दल काय म्हणाली शेफाली ?

पुढे शेफाली म्हणाली की. “जे मनाला आवडतं ते करा. तुम्ही या जन्मात जन्माला आला आहात, तुम्ही काहीही असलात तरी, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला जे करायचे आहे ते करा. पुढच्या जन्मात जर तुम्ही झुरळ म्हणून जन्माला आलात तर काय होईल, जर तुम्ही उंदीर झालात तर काय होईल. तुम्ही काय कराल? असा सवाल तिने विचारलाय तुम्ही जन्माला आला आहात आणि तुम्ही भाग्यवान देखील आहात. म्हणून ज्या गोष्टींमुळे तुम्हाला आनंदी वाटतं, ते करा. हां, पण कोणालाही दुखवू नका. पण जर तुम्ही स्वतःला सुधारण्यासाठी काही करू शकत असाल तर त्यात काय हरकत आहे.” असंही शेफालीने सांगितलं.