Shubhangi Sadavarte : 3 महिन्यांपूर्वीच घटस्फोटाची घोषणा, मराठी अभिनेत्रीची नवी सुरूवात, पुन्हा चढणार बोहल्यावर

संगीत देवबाभळी नाटकातून रसिकाच्या भेटीस येणाऱ्या, लोकप्रिय अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वीच घटस्फोटाची माहिती शेअर केली होती. पहिला संसार मोडल्यानंतर ती आता आयुष्याची नवी सुरूवात करत आहे. ती दुसरं लग्न करत असून लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. कोण आहे तिचा होणारा नवरा ?

Shubhangi Sadavarte : 3 महिन्यांपूर्वीच घटस्फोटाची घोषणा, मराठी अभिनेत्रीची नवी सुरूवात, पुन्हा चढणार बोहल्यावर
संगीत देवबाभळी फेम अभिनेत्री दुसरं लग्न करणार आहे.
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 22, 2025 | 1:23 PM

‘संगीत देवबाभळी’ या नाटकातून रसिकांच्या मनावर राज्य करणारी, घरांघरात जिचं नाव पोहोचलं अशी अभिनेत्री म्हणजे शुभांगी सदावर्ते. काही दिवसांपासून तिचं नाव सतत चर्चेत होतं. पाच वर्षांचा संसार मोडून शुभांगी आणि आनंद ओक यांनी घटस्फोटाची घोषणा केली. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्याधी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध गायत राहुल देशपांडे यांनी 17 वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाल्याची बातमी शेअर केली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसांनीच अभिनेत्री शुभांगी सदावर्ते आणि आनंद ओक यांनही विभक्त होत असल्याचं जाहीर केल्याने एकच खळबळ माजली. तिच्या चाहत्यांना रसिकांना मोठा धक्का बसला

मात्र आता शुभांगी सदावर्ते ही पुन्हा चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसंच खास आहे. पहिला संसार मोडल्यावर तिने आयुष्याची नवी सुरूवात करण्याचा निर्णय घेतला आहे. शुभांगी दुसरं लग्न करत असून तिचा व होणाऱ्या पतीचा केळवणाचा व्हिडीओ समोर आला आहे. शुभांगीने स्वतः तिच्या इन्स्टाग्रा अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करत ही गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केली आहे.

शुभांगी चढणार बोहोल्यावर

जुळली गाठ गं अशी कॅप्शन देते शुभांगीने तिच्या होणाऱ्या पतीसोबतचा फोटो, केळवणाचा व्हिडीओ अकाऊंटवर पोस्ट केला आहे. #shubhmeet❤️ #kelwanअसे हॅशटॅगही तिने त्यासोबतच लिहीले आहे. सुमीत म्हाशेळखर असे शुभांगीच्या होणाऱ्या पतीचे नाव असून त्यानेही हाच व्हिडीओ त्याच्या अकाऊंटवर शेअर करत नवराई माझी नवसाची अशी छानशी कॅप्शन त्यासोबतच लिहीली आहे.त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी घातलेला केळवणाचा सुंदर गाठ, त्यांच्या गप्पा-गोष्टी, हसू आणि जेवणाचा उत्तम मेन्यू… असा सगळ्याचा या सुंदर व्हिडीओत समावेश आहे.

 

त्या दोघांनी शेअर केलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्यावर लाईक्सचा वर्षाव करत शुभांगी सदावर्ते आणि सुमीत या दोघांना पुढल्या आयुष्यासाठी, नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी केली घटस्फोट

वर नमूद केल्याप्रमाणे शुभांगी हिचं हे दुसरं लग्न आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने पहिल्या पतीपासून विभक्त झाल्याचे जाहीर केले होते. 2020 साली शुभांगी आणि संगीतकार आनंद ओक यांनी लग्नगाठ बांधली होती. कोरोनकाळात त्यांचं लग्न झालं. पण पाच वर्षांनंतर त्यांचा संसार मोडला आणि त्या दोघांनी घटस्फोटाची बातमी सार्वजनिक रित्या जाहीर केली होती. घटस्फोटाच्या घोषणेनंतर आता, अवघ्या तीन महिन्यांत शुभांगीने दुसरं लग्न करत असल्याची आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे.

 

काही वर्षांपूर्वीच आम्ही दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता, असं आनंद ओक यांनी पोस्टमध्ये सांगितलं. आता हा निर्णय जाहीर करण्यासाठी योग्य वेळ आहे… आम्ही एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणाबद्दल मी कृतज्ञ आहे. तसेच मी शुभांगीला तिच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो,असंही त्यांनी नमूद केलं होतं.

‘संगीत देवबाभळी’ मुळे जरी शुभांगी लोकप्रिय झाली असली तरी तिने इतरही बरीच कामं केली आहेत. ‘पुन्हा कर्तव्य आहे ,’नवे लक्ष्य’ या मालिकेतही ती झळकली होती.