कान पकडले, उठाबशा घातल्या, माफी मागितली, सोनाक्षी सिन्हाने असं का केलं? Video व्हायरल

नीट पेपर लीक आंदोलनाला मोठे यश; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनाक्षी सिन्हाने थेट उठाबशा काढत मागितली माफी. व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल.

कान पकडले, उठाबशा घातल्या, माफी मागितली, सोनाक्षी सिन्हाने असं का केलं? Video व्हायरल
Image Credit source: Social media
| Updated on: Jul 25, 2026 | 9:47 PM

NEET पेपर लीक प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळालं आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी याला विद्यार्थ्यांच्या आणि विशेषतः Gen Z च्या एकजुटीचा विजय म्हटले आहे. या घडामोडींनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनेही आनंद व्यक्त करत एक मजेशीर व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

सोनाक्षी सिन्हा नेमकी काय म्हणाली?

सोनाक्षीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती आनंदाने नाचताना आणि उत्साहात झूमताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणते, ‘तुम्हाला माहीत नाही, आज तुम्ही किती मोठं काम केलं आहे. मी एक कलाकार आहे, पण Gen Z ही स्वतःमध्ये एक कला आहे. मी आधी त्यांना फार हलक्यात घेत होते. चार तास काम करून थकतात, त्यांच्याकडून काही होणार नाही असं मला वाटायचं. पण आता मी माझी चूक मान्य करते.’ यानंतर ती कान धरून उठाबशाही काढताना दिसते आणि स्वतःची चूक विनोदी पद्धतीने कबूल करते.

‘आता मलाही Gen Z व्हायचं आहे’

व्हिडिओमध्ये पुढे सोनाक्षी म्हणते, ‘आता पुन्हा कधीही Gen Z ला कमी लेखणार नाही. तुम्हा सर्वांना सलाम. मीसुद्धा आता Gen Z चा भाग व्हायचं आहे. तुम्ही जे करून दाखवलंत, ते खरंच अविश्वसनीय आहे.’ या व्हिडिओसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माझा अर्थ असा होता की मला तुमचा अभिमान आहे. धन्यवाद. एक मिलेनियल म्हणून माझा गैरसमज दूर झाला’ असं तिने म्हटलं.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियावर उत्साह

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या सोशल मीडियावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी याला विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आणि Gen Z च्या एकजुटीचा विजय म्हटले आहे. अभिनेते प्रकाश राज यांच्यासह अनेकांनीही या घडामोडीवर आनंद व्यक्त करत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us