AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या वनस्पतीचा नादच खुळा, साप पुन्हा आयुष्यात जवळ येणार नाही, आदिवासी लोकं साल खिशातच ठेवतात

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापाचा धोका अधिक असतो, कारण या दिवसांमध्ये साप बिळातून बाहेर पडून जमिनीवर येतात. अनेकदा साप आपल्या घरात देखील घुसतात, त्यामुळे या काळात सतर्क राहणं गरजेचं असतं.

या वनस्पतीचा नादच खुळा, साप पुन्हा आयुष्यात जवळ येणार नाही, आदिवासी लोकं साल खिशातच ठेवतात
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 25, 2026 | 9:22 PM
Share

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापाचा धोका वाढतो, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप बिळात कमी आणि बाहेर जास्त फिरत असतात. तसेच हा काळ म्हणजे अनेक विषारी सापांच्या प्रजनानाचा काळ देखील असतो, त्यामुळे या काळात साप अधिक आक्रमक होतात. साप निवाऱ्यासाठी नेहमी जिथे जास्त आद्रता आहे आणि अंधार आहे, अशी जागा शोधत असतात, त्यांना जर अशी जागा तुमच्या घरात सापडली तर ते थेट तुमच्या घरात देखील घुसू  शकतात. त्यामुळे या काळात विशेष काळजी घ्यावी लागते. तुम्ही अनेकदा पाहिलंही असेल की पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकदा तुमच्या गार्डनमध्ये किंवा सोसायटीमध्ये साप दिसून येतात, याचं कारण हेच आहे की, या काळात साप सुरक्षीत निवाऱ्याच्या शोधात असतात.

आपल्याकडे सापांबद्दल अनेक गैर समज आहे. त्यातील सर्वात मोठा गैर समज हा असतो, की प्रत्येक साप हा विषारी असतो, परंतु तसं काहीही नसतं. त्यामुळे तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला मारू नका, किंवा पकडण्याचा प्रयत्न देखील करू नका, त्याची माहिती  सर्पमित्रांना द्या, ते सापांना पकडून सुरक्षित स्थळी मुक्त करतील. सतर्कता हाच सापांपासून वाचण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे, म्हणजे जंगलात फिरत असताना किंवा शक्यतो पावसाळ्यात कुठेही जाताना पायामध्ये बूटच घालावेत, तसेच जिथे फार गवत वाढलेलं आहे, अशा जागी शक्यतो जाणं टाळावं.

परंतु अशा देखील काही वनस्पती आहे, ज्या सापांपासून वाचण्यास तुमची मदत करतात. या वनस्पतीच्या विशिष्ट गुणधर्मांमुळे साप तुमच्या आसपास देखील येत नाहीत. त्यातीलच एक वनस्पती आहे, ती म्हणजे मोहाचं झाड, आदिवासी संस्कृतीमध्ये मोहाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. कारण मोहाचं झाडं हे आदिवासी संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. मोहाला कल्पवृक्ष देखील म्हटलं जातं. मोहाच्या फुलांपासून दारू बनवली जाते, तसेच त्याचे विविध भाग विकले जात असल्यामुळे या वृक्षाचा आदिवासी लोकांना मोठा आर्थिक आधार असतो. या वृक्षाच्या सालीमध्ये असे काही विशिष्ट गुणधर्म असतात, ज्यामुळे साप या वृक्षाच्या सालीपासून दूर राहतो. त्यामुळे जंगलात फिरत असातना सापांपासून बचावासाठी आदिवासी लोक या वृक्षाची साल आपल्या खिशातच ठेवतात.

Follow Us
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं...
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं पद धोक्यात
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...