AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: आपसे बायबल के बारें में बात करनी थी…बोरिवलीमध्ये अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार

Video: मराठमोळी अभिनेत्री स्वाती देवलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने बोरिवली पश्चिम भागात तिला असलेला धक्कादायक अनुभव सांगितला आहे.

Video: आपसे बायबल के बारें में बात करनी थी...बोरिवलीमध्ये अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार
स्वाती देवलImage Credit source: Instagram
| Updated on: May 01, 2026 | 4:15 PM
Share

लक्ष्मीनिवास या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री एक धक्कादायक अनुभव आला आहे. अभिनेत्री स्वाती देवलने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत बोरीवली पश्चिम येथील धक्कादायक घटना सांगितली आहे. एका महिलेने आपसे बायबल के बारें में बात करनी थी असे म्हणत स्वातीशी संवाद साध्याचा प्रयत्न केला. आता तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं? चला जाणून घेऊया…

सोशल मीडियावर अभिनेत्रीची पोस्ट

स्वातीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती, “नमस्कार मी स्वाती देवल, मला एक गोष्ट सांगायची आहे. लहानपणी आपण शाळेत ऐकलं होतं, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत… खरोखरंच आपला देश असा आहे की, या देशात अनेक धर्म, जात आणि पंथाचे लोक राहतात. अगदी गुण्यागोविंदाने, एकत्र आणि प्रेमाने राहतात. पण असं आपल्याला वाटत होतं… आता बऱ्याच गोष्टी बदलायला लागल्या आहेत. टीव्हीवरील बातम्या, अनेक प्रसार माध्यमांमधून बऱ्याच गोष्टी कानावर येत असतात. वाईट कर्म करणारी लोक आपल्या आजूबाजूला आहेत, हे आपल्याला दिसत असतं… पण, या गोष्टी दुसरीकडे घडत असतात, आपल्यापर्यंत येत नाहीत, तोपर्यंत आपल्याला त्याची झळ पोहोचत नाही… पण माझ्याबरोबर एक घटना घडली…” असे म्हणाली.

View this post on Instagram

A post shared by Swati Deval (@swati.deval)

नेमकं काय घडलं?

पुढे नेमकं काय घडलं हे सांगताना स्वाती म्हणाली की, “बोरिवली (पश्चिम) इथल्या इंद्रप्रस्थ आणि मोक्ष प्लाझा परिसरात मी खरेदीसाठी गेले होते. यावेळी एका अनोळखी तरुणीनं मला गाठलं. ती मला म्हणाली, मॅम मला तुमच्याशी बोलायचंय… अर्थात तिनं हे हिंदीत विचारलं. त्यावर मी तिला क्या? असं म्हटलं. तर ती म्हणाली, आपसे बायबल के बारें में बात करनी थी… क्या आप बायबल के बारें में जानना चाहोगे… मुझे आपसे बात करनी है. त्यावर मी तिला मुझे आपसे कुछ बात नही करनी… धन्यवाद… असं म्हटलं आणि मी तिथून निघून आले.”

मी तिथून पुढे गेले, तरी माझ्या डोक्यात विचार सुरू होता की, ही बाई अचानक असं का विचारतेय? चांगल्या घरातली मुलगी, साधारण 28-30 वयोगटातली… माझ्या डोक्यात सतत विचार सुरू होता की, का हिनं मलाच विचारलं? मी मागे वळून पाहिलं तर ती माझ्यावर लक्ष ठेवून होती आणि माझ्याच आसपास घिरट्या घालत होती… मी रागानं तिच्याकडे पाहिलं आणि रस्ता ओलांडून दुसऱ्या बाजूला गेले. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनं मी तिच्यावर गपचूप लक्ष ठेवायला सुरुवात केली. त्यावेळी मला असं दिसलं की, ती बाई तेवढ्या भागात फिरत होती. काही बायकांना थांबवून त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती. नंतर बऱ्याच वेळानं ती आणखी एका मुलीला भेटली… ती मुलगीसुद्धा अशीच सगळ्यांना भेटून येत होती… मग त्या दोघी एकमेकींशी बोलल्या, काहीतरी कानात कुजबुजल्या… अत्यंत संशयित त्या दोन बायका मला वाटल्या… माझं चुकलं की मी त्यांचा व्हिडीओ शूट केला नाही, मग माझ्या लक्षात आलं की, हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे..

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना