AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुशांत सिंह राजपूतने जिथं जीवन संपवलं त्याच घराचं…अदा शर्माचा अचानक मोठा निर्णय; म्हणाली मेलेल्या माणसाचे…

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा गेल्या काही वर्षांपासून दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या घरात राहात आहे. हे घर खरेदी केल्यानंतर तिने काही दिवसांमध्ये मोठा निर्णय घेतला. आता नेमकं काय झालं जाणून घ्या...

सुशांत सिंह राजपूतने जिथं जीवन संपवलं त्याच घराचं...अदा शर्माचा अचानक मोठा निर्णय; म्हणाली मेलेल्या माणसाचे...
तंतोतंत सांगायचे झाल्यास आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीचा भाव 7124 रुपयांनी (2.97 टक्के) घसरून 2,32,663 रुपयांपर्यंत खाली आला. बाजार चालू झाल्यानंतर सोने आणि चांदीचा भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर लोकांनी नफावसुली केली. Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 29, 2025 | 7:26 PM
Share

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती कोणत्या चित्रपटासाठी नाही, तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अदा शर्मा गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंह राजपूतच्या घरात राहात आहे. सुशांतने याच घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. नंतर अभिनेत्री अदा शर्माने ते घर विकत घेतलं. आता त्या घरात ती आपल्या आईसोबत राहत आहे. पण अदाने सुशांत सिंह राजपूत वापरत असलेले संपूर्ण फर्निचर काढून टाकले आहे. तिने घरात नवे फर्निचर केले आहे.

अदा शर्माच्या घरात एकही जुने फर्निचर नाही

प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या यूट्यूब व्लॉग्समुळे खूप चर्चेत आहे. फराह अनेकदा बॉलिवूड स्टार्सच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत जेवण बनवतात आणि गप्पा मारताना दिसते. अलीकडच्या व्लॉगमध्ये फराह खान अदा शर्माच्या घरी पोहोचली आणि अदाच्या घराची स्थिती पाहून फराह स्वतःच थक्क झाली. जेव्हा तिने अदाच्या घराचे व्हिडीओ शेअर केले तेव्हा चाहतेही देखील तो पाहून हैराण झाले आहेत.

फर्निचर न ठेवण्याचं अदा ने सांगितलं हे कारण

फराह जेव्हा अदाच्या घरी पोहोचली, तेव्हा तिला दिसलं की अदाच्या घरात ना सोफा आहे, ना डायनिंग टेबल आणि ना कोणतंही लक्झरी फर्निचर. घराच्या मुख्य भागात बसण्यासाठी एक खुर्चीही दिसली नाही. फराहने विचारल्यावर अदाने सांगितली की ती आपल्या आईसोबत जमिनीवर बसूनच जेवते आणि तिच्या घरी कोणतेही मित्र येत नाहीत किंवा ती पार्टी करत नाहीत. तिचं घर रिकामं असण्याचं कारण हेही आहे की तिला रिकामी जागा आवडते जेणेकरून ती घरात आरामात नाचू शकेल किंवा काही खेळू शकेल.

सुशांतच्या घरात अदा शर्माला भीती वाटत नाही

दरम्यान, फराहने अदा शर्माला सुशांतच्या जुन्या घराबद्दल आणि त्याच्याशी जोडलेल्या आठवणींबद्दल विचारलं, तेव्हा तिने अतिशय निर्भीडपणे उत्तर दिलं. अदा म्हणाली की तिला मेलेल्या माणसांची किंवा भुतांची अजिबात भीती वाटत नाही. तिची देवावर गाढ श्रद्धा आहे आणि ती आपल्या आईसोबत या घरात नियमितपणे पूजा-पाठ करते. अदाचा विश्वास आहे की आता घराची ऊर्जा खूप सकारात्मक आहे.

ती पुढे म्हणाली, “मी खार पाळली आहे. माझ्या घरात एक टॉय वाली मांजरही आहे, ज्याचे इंस्टाग्राम पेज आहे. याशिवाय मी एक माशीही पाळली आहे. ही माशी माझ्याच घरात राहते.”

चामुंडेश्वरीपासून ‘अदा’ होण्याचा प्रवास

फराहशी बोलताना अदाने तिचं खरं नावही उघड केलं. तिने सांगितलं की तिचं खरं नाव ‘चामुंडेश्वरी’ आहे. तिच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी तिला घाबरवलं होतं की इतक्या जड नावाने तिला चित्रपटात काम मिळणार नाही. त्यामुळेच तिने आपलं नाव बदलून ‘अदा शर्मा’ केलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...