AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kerala Story | “त्यासाठी तुमचा शिरच्छेद करत नाही,” ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्माचं वक्तव्य चर्चेत

'द केरळ स्टोरी' या चित्रपटात अदा शर्माशिवाय योगिता बिहानी, सिद्धी इदनानी, सोनिया बलानी, विजय कृष्ण, प्रणय पचौरी आणि प्रणव मिश्रा यांच्याही भूमिका आहेत. सुदिप्तो सेन यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून विपुल शाह त्याचे निर्माते आहेत.

The Kerala Story | त्यासाठी तुमचा शिरच्छेद करत नाही, 'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माचं वक्तव्य चर्चेत
Adah SharmaImage Credit source: Instagram
| Updated on: May 26, 2023 | 10:47 AM
Share

मुंबई : ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटामुळे अभिनेत्री अदा शर्मा सध्या यशाच्या शिखरावर आहे. भारतात कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार करणारा हा महिलाप्रधान भूमिका असलेला पहिला चित्रपट ठरला आहे. आता 300 कोटींकडे या चित्रपटाची वाटचाल सुरू आहे. कारण जगभरात ‘द केरळ स्टोरी’ची कमाई आतापर्यंत जवळपास 260.5 कोटी रुपये इतकी झाली आहे. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं धर्मांतर केल्यानंतर त्यांना कथित ISIS दहशतवादी संघटनेत सामील करून घेतलं गेलं, अशी कथा यामध्ये दाखवण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट ‘इस्लामोफोबिक’ असल्याची टीका होत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अदा शर्मा याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

मुस्लीम तरुणीचा दिग्दर्शकांना मेसेज

‘पिंकविला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत अदाने एका मुस्लीम तरुणीची कथा सांगितली. चित्रपट पाहिल्यानंतर कशा पद्धतीने तिच्या विचारांमध्ये बदल झाला, त्याबद्दल तिने सांगितलं. ती म्हणाली, “चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर एका मुस्लीम मुलीने दिग्दर्शकांना मेसेज केला होता. तुम्ही अशा पद्धतीचं इस्लामोफोबिक चित्रपट कसा बनवू शकता, असा सवाल करत ती दररोज त्यांना वाईट मेसेज करायची. पण तिने जेव्हा आमचा चित्रपट पाहिला, तेव्हा तिची प्रतिक्रिया पूर्ण वेगळी होती. काही लोक इस्लामचा कशा पद्धतीने गैरवापर करत आहेत, हे तुम्ही खऱ्या अर्थाने चित्रपटात दाखवलं. तुम्ही आमच्या धर्माची सेवा केली आहे. कारण आमचा धर्म कसा नाही हे तुम्ही लोकांना सांगत आहात, असा मेसेज तिने दिग्दर्शकांना केला होता.”

“मी खुश आहे की मी अशा देशात राहते, जिथे..”

अदा शर्मा पुढे म्हणाली, “मला वाटत नाही की जगातील कोणताही धर्म किंवा संत तुम्हाला असं करण्यास सांगणार नाही जे मानवतेला हानिकारक असेल. दुसऱ्याचा जीव घेणाऱ्या लोकांमध्ये काहीतरी चुकीचं नक्कीच असेल. मी खुश आहे की मी अशा देशात राहते, जिथे मला माझी मतं मांडण्याचं स्वातंत्र्य आणि भाषणस्वातंत्र्य आहे. मतस्वातंत्र्य असल्याबद्दल तुमचा कोणी इथे शिरच्छेद करत नाही. मी लिपस्टिक लावू शकते आणि त्यामुळे माझे हात कापले जात नाहीत. माझी फक्त एकच विनंती आहे की लोकांनी आधी हा चित्रपट पहावा आणि त्यानंतर मत मांडावं. याचीही माझ्या देशात परवानगी आहे.”

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात अदा शर्माशिवाय योगिता बिहानी, सिद्धी इदनानी, सोनिया बलानी, विजय कृष्ण, प्रणय पचौरी आणि प्रणव मिश्रा यांच्याही भूमिका आहेत. सुदिप्तो सेन यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून विपुल शाह त्याचे निर्माते आहेत.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...