AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्या घरात सुशांतने घेतला अखेरचा श्वास, त्याच घरात कोणत्याही फर्नीचरशिवाय का राहतेय प्रसिद्ध अभिनेत्री?

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वांद्रे इथल्या फ्लॅटमध्ये अभिनेत्री अदा शर्मा राहतेय. या घरात तिने कोणतंच फर्नीचर ठेवलं नाही. यामागचं कारण तिने स्वत: नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

ज्या घरात सुशांतने घेतला अखेरचा श्वास, त्याच घरात कोणत्याही फर्नीचरशिवाय का राहतेय प्रसिद्ध अभिनेत्री?
सुशांत सिंह राजपूतImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 14, 2026 | 12:26 PM
Share

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने सहा वर्षांपूर्वी याच दिवशी (14 जून) जगाचा अखेरचा निरोप घेतला होता. त्याच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. मुंबईतील वांद्रे परिसरातील राहत्या निवासस्थानी सुशांत मृतावस्थेत आढळला होता. नंतर त्याचं हे घर काही काळ बंदच ठेवण्यात आलं होतं. कारण त्या घरात राहण्याचं धाडस कोणीच करत नव्हतं. अखेर काही वर्षांनंतर ‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्माने सुशांतचं घर भाडेतत्त्वावर घेतलं. आता नुकत्यात दिलेल्या एका मुलाखतीत अदा शर्मा सुशांतच्या घरात राहण्याच्या निर्णयाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.

14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याचं घर बराच काळ रिकामं राहिलं होतं. नंतर जेव्हा अदा तिथे राहायला गेली, तेव्हा तिला सुरुवातीला मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. आता सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त अदा शर्माने घरावरून झालेला वाद, लोकांच्या प्रतिक्रिया आणि घरातील एकंदर वातावरणाबद्दल व्यक्त झाली.

‘झूम’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुशांतच्या घरात राहायला गेल्यानंतर लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांना तिने कसं हाताळलं, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अदा म्हणाली, “तीन वर्षांपासून ओसाड आणि बंद असलेलं घर अखेर पुन्हा वापरात येत असल्याचा लोकांना खरंतर आनंद झाला होता. माझ्यावरील बहुतेक आरोप हे केवळ बातमीला सनसनाटी बनवण्याचा प्रयत्न होता. खरंतर लोक आनंदी होते. फक्त क्लिक्स मिळवण्यासाठी तशा बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. मला प्रत्यक्षात कोणत्याही समस्यांना सामोरं जावं लागलं नाही.”

View this post on Instagram

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

सुशांतच्या जुन्या वस्तू किंवा फर्निचर अजूनही फ्लॅटमध्ये आहेत का, असा प्रश्न तिला पुढे विचारण्यात आला. त्यावर तिने स्पष्ट केलं की, फ्लॅटमध्ये सुशांतच्या कोणत्याही वस्तू नाहीत. संपूर्ण घर रिकामं ठेवण्यात आलं होतं. “त्या फ्लॅटचे घरमालक लालवानी आहेत. जेव्हा मी तिथे राहायला गेले, तेव्हा त्यात एकही फर्नीचर नव्हतं. घरमालकाने मला फर्नीचरबद्दल विचारलं होतं, पण मी नकार दिला. कारण मला खचाखच भरलेल्या खोल्यांपेक्षा मोकळ्या, रिकाम्या जागा अधिक आवडतात. त्यामुळे मी फ्लॅटमध्ये कोणतंच फर्नीचर ठेवलं नाही. मी माझ्या या घरात खूप आनंदी आहे आणि इथे खूप सकारात्मक ऊर्जाही जाणवते. माझा असा विश्वास आहे की आपण जिथे कुठे राहतो, तिथे नेहमी वर्तमानात जगावं आणि फक्त सुंदर, आनंदी आठवणी निर्माण करण्याचा प्रयत्न करावा”, असं अदा पुढे म्हणाली.

अदा शर्मा गेल्या 18 वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत काम करतेय. नुकतीच ती चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित ‘द गव्हर्नर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले