AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadinath Kothare : माझ्यासोबत हे काय घडलं? आदिनाथ कोठारेनं सांगितला रणबीर आणि साईसोबत काम करण्याचा अनुभव

मराठी सिनेमात नाव कमावून आदिनाथ कोठारे सध्या मोठ्या हिंदी प्रोजेक्ट्मध्ये आपले नाव कमावत आहे. रामायणमध्ये सध्या तो रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसत आहे. रामायणाचा भाग झाल्यानंतर आदिनाथला आलेला अनुभव त्याने सांगितला आहे.

Aadinath Kothare :  माझ्यासोबत हे काय घडलं? आदिनाथ कोठारेनं सांगितला रणबीर आणि साईसोबत काम करण्याचा अनुभव
adinath kothare in ramayan Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Oct 20, 2026 | 10:40 PM
Share

मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या त्याच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठ मोठ्या प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. यामी गौतमीसोबतचा नयी नवेली सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. त्यातच लवकरच 5 नोव्हेंबर 2026 ला रामायण देखील जगभरात आणि भारतात एकाच वेळी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे मराठीचा डंका सातासमुद्रापार वाजणार आहे.

नितेश तिवारी यांच्या आगामी रामायण चित्रपटात आदिनाथ कोठारे भरताची भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात रणबीर कपूर हे प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत, तर साई पल्लवी माता सिताच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे अॅडवान्स बुकींग देखील लवकरच सुरू होणार आहे. या सिनेमातील काही भागांचे शूटिंग अयोध्येत झाले आहे. याच दरम्यान आदिनाथने या सिनेमात काम करताना त्याला आलेल्या दिव्यतेचा एक खास अनुभव सांगितला आहे.

अयोध्येत शूटिंगच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण मुख्य कलाकारांसोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली होती. अयोध्येत शूटिंगच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण मुख्य कलांकारांसोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली. आदिनाथ कोठारेने हिंदुस्थान टाइम्स शी बोलताना रामायण च्या सेटवरील पहिल्या दिवसाच्या आठवणी सांगितल्या. अयोध्येत शुटिंग सुरू असताना रणबीर कपूर, सई पल्लवी, रवी दुबे आणि इतर मुख्य कलाकारही सेटवर उपस्थित होते. या सगळ्यांसमोर एका मोठ्या चित्रपटाचा भाग होणं त्याच्यासाठी खास अनुभव होता.

शूटिंग सुरू असताना आपण आपल्या भूमिकेत इतके शिरलेले असतो, गुंतलेले असतो की त्या क्षणी आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचही भान राहत नाही. आपण बस आपलं काम करण्यात गुंग असतो. असे आदिनाथ म्हणाला. त्या दिवशीही मी माझी भूमिका करत होतो. काही महत्त्वाच्या सीनचं शूट चालू होतं ते मी नीट केलं, पण मग अचानक घरी आल्यावर तो सीन पुन्हा आठवला आणि असं झालं हे काय घडलंय माझ्यसोबत, मी किती मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आणि किती मोठी भूमिका साकारली.

रामायणाच्या टिमचा भाग असल्याचा अभिमान

या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी करत असून,निर्माते नमित मल्होत्रा आणि छायाचित्रकार पंकज कुमार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा आदिनाथला आनंद आहे.संगीतासाठी ए.आर रहमान आणि हान्स झिमर यांच्यासारखी नावं या प्रोजक्टशी जोडली गेली आहेत. त्यांच्या कामाशी लहानपणापासून परिचित असल्याने या चित्रपटाचा भागं होणं आपल्यासाठी मोठी गोष्ट असल्याचं आदिनाथने म्हटलं आहे. मराठी मनोरंजनविश्वात स्वत:ची ओळख निर्माण केल्यानंतर आदिनाथ आता हिंदीतील या भव्य प्रोजेक्टमध्ये भरताची भूमिका साकारला जाणारा भरत प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!